आंबेगाव (पुणे) : पतीचा तेलाच्या डब्यांचा स्क्रॅपचा व्यवसाय सध्या बंद आहे. त्यातच स्वतःचे काम सुटले. लॉकडाउन असल्याने हाती कोणते काम नाही आणि त्यामुळे दामही नाही. हातचा पैसाही संपत चालला होता, घर खर्च सांभाळायचा आहे. दोन लेकरही सांभाळायची आहे, अशा एक ना अनेक प्रश्नांना तोंड देण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करून पती व संसाराला आधार देण्यासाठी मैदानात उतरून स्त्रिया या किती समर्थ असू शकतात हे राधिका मोरे यांनी दाखवून दिले आहे.
लॉकडाउनमुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंब ही आर्थिक संकटात सापडली आहेत अशाच कुटुंबापैकी एक आहेत राधिका मोरे. घर आर्थिक संकटात सापडत चालल्याची जाणीव होताच त्या मैदानात उतरल्या. शेतकऱ्यांकडून फळ घेऊन ती विक्री करण्याचा निर्णय घेत आंबेगाव येथे एक छोटेखानी फळविक्रीचा स्टॉल उभा करत त्या फळविक्री करत आहे.
टेन्शन तर आहे सर पण आता काम तर केल पाहिजेचचा ना ! आम्ही सर्व नियम पाळत दोन पैसे कमावण्याच्या दृष्टीने व्यवसाय करत आहोत असे सांगत सांगत फळ खरेदीसाठी आलेले काही ग्राहकही त्या हाताळत होत्या.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
घर संकटात आल्यावर पतीच्या खांद्याला खांदा लावून संकटातून मार्ग काढू पाहणाऱ्या महिलांचे राधिका मोरे एक प्रातिनिधिक स्वरूप आहेत. छोट्या व्यावसायिकांबाबत येत्या लॉकडाउनच्या काळात प्रशासनाने सहकार्याचीच भूमिका घेणे गरजेचे बनले आहे. कारण ही लोक संकटकाळातही स्वावलंबीपणे कसे जगावे ही शिकवण कळत नकळत समाजाला देत आहे.
"घर भाड्यात सवलत जरी असली तरी आज ना उद्या मेहनत करून पैसे द्यावेच लागणार आहेत ना ? मग आत्तापासूनच मेहनत करायला काय हरकत आहे. इतरही घर खर्च आहेत.'
-राधिका मोरे, गृहिणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.