Women should change their mindset Said Dr. Kalpana Baliwant 
पुणे

Video : महिलांनी मानसिकता बदलायला हवी : डॉ. कल्पना बळिवंत

सकाळवृत्तसेवा

पुणे : "'बेटी बचाव'चा कायदा बनविला; पण पुढे काय, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. हा विषय प्रत्येकाने स्वत:शी बोलण्याचा आहे, असे सांगतानाच आता पुरुषांना महिलांच्या बरोबरीने किचनमध्ये यायचे आहे. त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. अनेक महिलांना हे रुचत नाही. त्यासाठी महिलांनी मानसिकता बदलायला हवी, असे मत पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळिवंत यांनी व्यक्त केले. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्‍लब ऑफ पुणे कर्वेनगर, नॅशनल मेडिकोज असोसिएशन, जनमित्र फाउंडेशन आयोजित 'आदिशक्ती' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 'बेटी बचाव, बेटी पढाव' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, डॉ. शरद आगरखेडकर, स्वाती जोगळेकर, डॉ. सुधा चौधरी, डॉ. अनघा लवळेकर, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, 'रोटरी'च्या आशा अमोणकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या या महिलांचा सत्कार करण्यात आला. 

पिंपरी : तरुणीला दाखवले नोकरीचे आमिष अन्...

चौधरी म्हणाल्या, "महिला सबलीकरणामध्ये केवळ महिलांचाच नाही, तर पुरुषांचा मोठा वाटा असतो. मला माझे वडील आणि पतीने माझे करियर यशस्वी होण्यासाठी मदत केली आहे. तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर शिक्षण घ्या आणि घेतलेले शिक्षण वाया घालू नका. आर्थिक सक्षम बनण्याचा प्रयत्न करा.'' 

देसाई म्हणाल्या, "मुलीला केवळ शिकवू नका, तर तिला स्वत:च्या पायावर उभे करा. तिच्या शारीरिक रक्षणाबरोबरच मानसिक रक्षण केली पाहिजे.'' 


कामशेतमध्ये ट्रेलरचालकाला मारहाण; अन्...

लवळेकर म्हणाल्या, "मुलांच्या दृष्टिकोन लहान वयापासून म्हणजे अगदी सातवी-आठवीपासून योग्य रितीने बांधले गेले, तर ते प्रौढ झाल्यानंतर त्याची अभिव्यक्ती योग्य असेल. त्यामुळे लहान वयातच महिलांचा आदर करणे मुलांना शिकविले पाहिजे.'' 

पुणे : नागरिकांची संख्या 40 हजार अन् पोलिस फक्त 28

पुणे जिल्ह्यातच मुलींचा जन्मदर कमी आहे. आपल्या देशात स्रीचा आदर पूर्वापार आहे; पण या वृत्तीत विकृती आल्याने स्रीभ्रूण हत्या होऊ लागल्या. आदिवासी आणि मुस्लिम समाजात मुलींचा जन्मदर चांगला आहे, हे पाहणीत दिसते. आता डॉक्‍टरांनी लिंगनिदान करणारच नाही, याचा निर्धार केला पाहिजे. 
- डॉ. राजेंद्र फडके, राष्ट्रीय संयोजक, बेटी बचाव अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT