kavi.jpg 
पुणे

पुणे-नगर-पुणे प्रवास करणे महिला अधिकाऱ्याला भोवले; हायवेवर घेतलं ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच प्रशासन विविध पातऴ्यावर प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना रोज पुणे-नगर-पुणे प्रवास करणे चांगलेच भोवलं आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता कविता नावंदे या दररोज ये-जा करत होत्या. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास करताना ताब्यात घेतलं आहे.

जिल्हा बंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी नावंदे यांना श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी ही कारवाई केली आहे त्या पुण्यावरून नगरला प्रवास करत असताना कुठलीही परवानगी न घेता त्या दररोज पुणे नगर प्रवास करत होत्या, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आदेश दिले आहेत. त्यात जिल्हा बंदीचाही आदेश आहे. मात्र, त्यांच्या या आदेशाला प्रशासनातीलच अधिकारी हरताळ फासत आहेत.

नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना महसुलाच्या पथकाने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली. कविता नावंदे या नगरवरून रोज पुण्याचा प्रवास करतात. मात्र त्यासाठी त्यांनी अधिकृत कुठलाही परवाना घेतलेला नाही. तरीही त्या प्रवास करतात.

गुरुवारी सकाळी त्यांना अशाच प्रवासादरम्यान पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्यांचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार चारुशीला पवार आणि  योगीता ढोले यांच्या पथकाने थांबविले. परवान्याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मिऴाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT