Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari
Work on Pune-Satara highway stalled due to Axis Bank nitin Gadkari  
पुणे

पुणे-सातारा हायवेचं काम कोणामुळं रखडलं; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे : टोल भरूनही पुणे सातारा रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर (एनएचएआय) टीकेची झोड उठते. त्यावर केंद्रीय वाहतूक व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी खुलासा करताना टोलच्या माध्यमातून जमा होणारे पैसे अॅक्सिस बँकेने स्वतःच्या खात्यावर जमा केले, ते ठेकेदाराला न दिल्याने काम रखडले होते, याबाबत कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे तक्रारही केली होती, असे स्पष्ट केले.

पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान; दहशत माजवण्याचा प्रयत्न!

नितीन गडकरी यांनी पुणे सातारा महामार्गाचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असे आश्‍वासन दिले आहे, त्याबाबत त्यांना विचारले असता गडकरी म्हणाले, ‘‘पुणे-सातारा मार्गावर चार ठिकाणचे पुलाचे काम अर्धवट होते. त्यातील एकाचे काम आत्ताच पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च महिन्यापर्यंत ‘एनएचएआय’कडून पूर्ण होईल. या रस्त्याच्या कामासाठी अ‍ॅक्सिस बँकेने वित्तपुरवठा केला आहे. टोलमधून जमा झालेले पैसे त्यांच्या खात्यात जमा होत होते, हे पैसे ठेकेदाराला मिळत नसल्याने रस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे या बँकेवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलिस अधिक्षकांना पत्र लिहिले होते. मात्र महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी पैसेच उपलब्ध नव्हते. वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शेवटी ‘एनएचएआय’ला पैसे देऊन या मार्गाचे काम सुरू केले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.


पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गडकरीचां चंद्रकांत पाटलांना टोला
अॅक्सिस बँकेच्या प्रकरणामुळे ‘एनएचएआय’ने पैसे दिले, तरीही टोल घेता म्हणून माझ्यावर टीका झाली, पण पुणे-सातारा मार्गावर वाहन चालकांना टोल द्यावाच लागणार आहे. चांगले रस्ते हवे असतील, तर वाहन चालकांनी टोल भरलाच पाहिजे. महाराष्ट्र सरकारे टोलमुक्तीची घोषणा केली, पण अजून त्या टोलवाल्यांना पैसे मिळालेले नाहीत, असा टोला गडकरी यांनी शेजारी बसलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पहात लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT