सोमवार पेठ - जीवनधारा मतिमंद मुलांच्या विद्यालयात आनंदमेळाव्याचे सहभागी झालेले माजी आमदार मोहन जोशी आणि दिव्यांग मुले.
सोमवार पेठ - जीवनधारा मतिमंद मुलांच्या विद्यालयात आनंदमेळाव्याचे सहभागी झालेले माजी आमदार मोहन जोशी आणि दिव्यांग मुले. 
पुणे

दिव्यांग मुलांनी लुटला खाऊ, खेळण्यांचा आनंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करीत वाटा शोधणाऱ्या चिमुकल्यांना आजचा दिवस आनंदाची पर्वणी देणारा ठरला. या वेळी लगोरीचा खेळ, फुग्यांची सजावट आणि केकच्या मेजवानीचा मनमुराद आनंद दिव्यांग मुलांनी लुटला. 

जागतिक अपंग दिन व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दारुवाला पुलाजवळील जीवनधारा मतिमंद मुलांच्या विद्यालयात कार्यक्रम झाला. यात विशेष मुलांसह सामान्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, आम्ही तुमच्यातीलच एक आहोत, असे सांगत एकोप्याचा संदेशही दिला. माजी आमदार मोहन जोशी, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पीयुष शहा आदी यावेळी उपस्थित होते. तसेच या वेळी संस्थेतील मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

‘‘दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हे आपलेच कर्तव्य आहे. तसेच सामान्य लोकांनी वर्षातील किमान एक दिवस अशा मुलांसाठी दिला पाहिजे,’’ असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT