Kidney 
पुणे

कोरोना बाधितांना डायलिसिससाठी करावी लागते वणवण

सकाळवृत्तसेवा

जागतिक किडनी दिन विशेष
पुणे - काकांना वीस वर्षांपासूनचा मधुमेह.  त्यातच त्यांना कोरोना झाला. होम क्वारंटाइनमध्ये उपचार सुरू असतानाच क्रीएटिनीनदेखील वाढलं. डॉक्टरांनी तातडीने डायलिसीस करायला सांगितलं. पण, पॉझिटिव्ह रुग्णांवर मोजक्याच ठिकाणी डायलिसीस होतं आणि तेथेही आता जागा नाही. नंतर थेट ससून रुग्णालय गाठलं आणि अखेर डायलिसिस झालं...” समीर पानसे यांना आलेला हा विदारक अनुभव.

उद्या (ता. ११) ‘जागतिक किडनी दिन’ आहे. त्या पार्श्वभूमीवर किडनीविकार असलेल्या कोरोनाबाधितांना डायलिसिससाठी कसे वणवण फिरावे लागत आहे, त्याची व्यथा पानसे यांनी ‘सकाळ’ला सांगितली. वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांशी संपर्क साधल्यानंतर, तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे डायलिसीस करणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे अशा रुग्णांवर डायलिसीस करायचे कुठे, असा गंभीर प्रश्न शहरात निर्माण झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. अभय सदरे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे मधुमेह होतो. तसेच, कोरोनामुळेच किडनी विकाराच्या उपचारातील गुंतागुंतही वाढते. किडनीचा त्रास असणाऱ्यांना कोरोना झाल्यास त्यापैकी ४० टक्के रुग्णांमध्ये क्रिएटिनीनचे प्रमाण वाढू शकते. काही रुग्णांमध्ये किडनीचे कार्य थांबते. हे कार्य कायमस्वरुपी थांबलेले आहे की, कोरोनामुळे तात्पुरते थांबले आहे, हे समजण्यासाठी तीन महिने लागतात. त्यानंतरच खात्रीपूर्वक किडनीच्या कार्याबद्दल सांगता येते. कोरोनाचा संसर्ग कमी होईल, त्या प्रमाणात किडनीचे कार्य पूर्ववत होण्याची क्रिया काही रुग्णांमध्ये घडण्याची शक्यता असते.’’

कोरोनाचा किडनीवर नेमका कोणता आणि कसा परिणाम झालाय, हे सातत्याने तपासण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वंकष दृष्टिकोनाची गरज
किडनीचे उपचार करताना सर्वंकष दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचे मत मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांनी व्यक्त केले. रुग्णांना इतरही आजार असतात. मधुमेह, स्थूलता हे आणि असे काही आजार चयापचयाशी संबंधित आहेत. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना, त्याच्या पोटापासून सुरवात केली पाहिजे. यकृताच्या कार्यात अडथळे येण्यास सुरुवात झाल्याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर होतो. त्यात किडनीवरही दुष्परिणाम होतो, असे ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT