From this year the course of MCA is two years 
पुणे

यंदापासून 'एमसीए'चा अभ्यासक्रम दोन वर्षाचा ; तंत्र शिक्षण विभागाचे पत्र

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "मास्टर्स इन कॉम्प्युटर एप्लिकेशन' हा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून तीन ऐवजी दोन वर्षाचा असणार आहे. पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचे परिपत्रक सर्व शिक्षणसंस्थांसाठी प्रसिद्ध केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'एमसीए' अभ्यासक्रम २ वर्ष कालावधीचा राहील, असा निर्णय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) विद्यापीठ अनुदान आयोगानेही एमसीए अभ्यासक्रमाचा कालावधी हा तीन वर्षांहून कमी करत दोन वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने अधिकृतरीत्या परिपत्रक काढत हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा करण्यात आल्याने स्पष्ट केले.

इंधन दरवाढीचा वेग सुसाट; पेट्रोल स्थिर, डिझेलची मात्र दरवाढ मात्र सुरूच

यापूर्वी एमसीए कोर्स दोन वर्षे आणि तीन वर्षे अशा दोन वेगवेगळ्या मुदतीचा होता. आता या नवीन निर्णयामुळे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी एमसीए कोर्स दोन वर्षांचाच असेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. "एआयसीटीई'ने घेतलेल्या निर्णयानुसार एमसीए अभ्यासक्रमाची सर्व संबंधित संस्थांनी कार्यवाही करावी, असे आदेश पुणे तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिले आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेने देखील दोन वर्षाच्या 'एमसीए'ला मान्यता दिली होती.
गटारीसाठी आणली 19 बकरे अन् चोरट्यांनी मारला डल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT