education
education 
पुणे

यंदा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम होणार कमी - दिनकर पाटील

मीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा

पुणे -  "यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांमधील अभ्यासक्रम जवळपास 20 ते 25 टक्‍क्‍यांनी कमी करण्यात येणार आहे. त्यावर प्रत्येक विषयाच्या तज्ज्ञ समितीमार्फत काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. जूनअखेरपर्यंत कमी केलेला अभ्यासक्रम जाहीर करण्यात येईल,' अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक दिनकर पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

शैक्षणिक वर्ष 2020-21 सुरू झाले, तरीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहे. मात्र, शिक्षण सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा अभ्यासक्रम कमी करण्यात येणार आहे. त्या त्या विषयातील अभ्यास समितीसमवेत झालेल्या प्राथमिक बैठकीत साधारणतः 20 ते 25 टक्‍क्‍यांनी अभ्यासक्रम कमी करण्याबाबत चर्चा झाली आहे. 

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पालक आणि शिक्षक यांच्याकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे सांगितले होते. मात्र, त्याआधीपासूनच राज्य सरकारने अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. त्यासाठी "एससीईआरटी'ने प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ समिती नेमली आहे. "यंदाच्या वर्षात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि क्षमता, यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, यादृष्टीने अभ्यासक्रमातील कोणता भाग कमी करता येईल, हे समितीतील तज्ज्ञ सुचविणार आहेत. त्यानुसार अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल. समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे,' असे पाटील यांनी सांगितले. 

अभ्यासक्रम सरसकट कमी करण्यात येणार नसून तज्ज्ञ समिती ठरवेल त्याप्रमाणे हा निर्णय घेतला जाईल. त्या त्या इयत्तेनुसार एखाद्या पाठाचे महत्त्व, पाठातून मिळणारे ज्ञान, एका पाठाचा दुसऱ्या पाठाशी असणारा संबंध, याचा बारकाईने विचार करण्यात येईल. 

पाटील म्हणाले, "अभ्यासक्रम कमी करणे, हे समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. काय कमी करायचे, हे नेमके ठरल्यानंतर ते सर्वांपर्यंत पोचविले जाणार असून, सर्वांना पाहण्यासाठी त्यातील सविस्तर माहिती ऑनलाइन देखील उपलब्ध असणार आहे.' 

पुण्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच; २३ वर्षीय तरुणानं घेतला गळफास!

अभ्यासक्रम कमी करणे म्हणजे तो वगळणे नव्हे. तर, अभ्यासक्रमातील काही भाग हा विद्यार्थ्यांना स्वतः अभ्यासाकरिता दिला जाईल. तर, पुढील इयत्तेशी संबंधित नसलेला काही अभ्यासक्रम कमी करण्यात येईल. तर काही भाग स्वयंअध्ययनासाठी देण्यात येणार आहे. 
- दिनकर पाटील, संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद 
 

- जवळपास 20 ते 25 टक्के अभ्यासक्रम कमी होण्याची चिन्हे 
- तज्ज्ञ समितीमार्फत काम सुरू 
- कमी झालेल्या अभ्यासक्रमाची माहिती महिनाअखेरपर्यंत देणार 
- काही भाग हा विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देणार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT