yevlewadi saswadkar usual traffic jam in Pune traffic police school student Sakal
पुणे

Pune Traffic : पुणे शहरातील नेहमीच्याच वाहतूक कोंडीने येवलेवाडी, सासवडकर बेजार

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका हा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या खडी मशिन चौक ते बोपदेव घाटमार्गे सासवड, जेजुरी, बारामती आणि फलटण जाणारे नागरिक हे या मार्गावर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीने बेजार झाले आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका हा शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसू लागला आहे.

या वाहतूक कोंडीमुळे सासवडहून महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे शहरात ये-जा करणारे विद्यार्थी आणि येवलेवाडीतून शहरातील शाळांमध्ये स्कूल बसमधून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

मागील चार ते पाच महिन्यांपासून या रस्त्यांवर सांडपाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु असून, हे काम अर्धवट राहिल्यानेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बोपदेव घाट ते खडी मशिन चौक या परिसरात सिंहगड इन्स्टिट्यूट, बधे शिक्षण संस्था, के.जे. इन्स्टिट्यूट या प्रमुख शिक्षण संस्थांसह महापालिकेच्या दोन शाळा, ट्रिनिटी स्कूल, विद्या हायस्कूल, सिंहगड हायस्कूल या नामवंत शाळा आहेत.

याशिवाय खडी मशिन चौक, येथे महापालिकेच्या दोन शाळा, प्रतिभा पवार माध्यमिक विद्यालय, रसिकलाल धारिवाल सीबीएसई स्कूल येवलेवाडीत जिल्हा परिषदेची शाळा, कै. खंडू कामठे माध्यमिक विद्यालय आदी शाळा आहेत.

या सर्व शैक्षणिक संस्थांमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या शालेय बसेसची संख्या लक्षणीय आहे. परिणामी या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास हा शालेय विद्यार्थ्यांना होऊ लागल्याचे भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि नागरिकांची या नेहमीच्याच वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका करण्यासाठी या रस्त्यावरील रखडलेले सांडपाणी पाइपलाईनचे काम त्वरित पूर्ण करणे आणि या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.

‘... अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार’

या नेहमीच्याच वाहतूक कोंडीचा कोंढवा, येवलेवाडी, उंड्री, पिसोळी येथील स्थानिक नागरिकांबरोबरच हडपसर, मंतरवाडी, कदमवाकवस्ती, जेजुरी, सासवड आणि बारामतीहून बोपदेव घाटमार्गे पुणे शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसू लागला आहे.

या नेहमीच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा भाजपचे नेते जालिंदर कामठे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT