Crime 
पुणे

'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या जोडप्यात लॉकडाऊनमुळे उडाले खटके; मग...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तिने त्याच्यावर प्रेम केले, आई वडिलांचा विरोध झुगारून ती त्याच्याबरोबर "लिव्ह इन रिलेशनशिप"मध्ये पुण्यात येऊन राहू लागली. पण लॉकडाऊनमुळे सतत एकत्र राहून त्यांच्यात खटके उडाले, त्याने तिला मारलेही. अखेर तो आपल्याला संपवून टाकेल, या भितीपोटी तिने पोलिसांकडे मदत मागितली आणि पोलिसांनी तिची सुटका केली!

पीडित तरुणी ही मूळची मुंबई येथील आहे. तिची पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणबरोबर ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणी पुण्यात आली, त्यानंतर ते दोघे "लिव्ह इन रिलेशनशिप"मध्ये एकत्र राहू लागले  त्याचवेळी लॉकडाऊन सुरू झाल्याने ते दोघे एकत्र अडकून पडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सतत एकत्र राहिल्याने त्यांच्यात हळूहळू किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. त्याने तिला मारहाण ही केली. ज्याच्यावर विश्वास टाकून ती पुण्यात आली, त्याच्या अशा अचानक बदललेल्या स्वभावामुळे आता तो आपल्याला संपवून टाकेल, अशी भीती तिला वाटू लागली. त्यामुळे तिने परत घरी जाण्याचा निर्णय घेतला.

अखेर तिने पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीशी संपर्क साधत घडलेली घटना सांगून तिने तिला  मुंबई येथे जाण्याची पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तिला योग्य ती मदत पुरविली. मुंबई येथे जाण्यासाठी पास देतानाच तिच्या जाण्याची व्यवस्था ही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT