Pune Flyover 
पुणे

Pune: पुण्यात उड्डाणपुलावर चढून तरुणाचं जीवघेणं आंदोलन! तहसीलदारावर कारवाईची केली मागणी

हातात फलक घेऊन त्यानं तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Pune News: पुण्यातील संचेती रुग्णालयाजवळील उड्डाणपुलावर चढून एका तरुणानं शोले स्टाईल जीवघेणं आंदोलन सुरु केलं आहे. जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाईची मागणी करणारा फलक हातात घेऊन तो पुलाच्या खांबावर जाऊन बसला आहे.

यामुळं या चौकात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांनी नक्की काय सुरु आहे हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. (young man life threatening protest by climbing on flyover in Pune demanded action against Tehsildar)

सुत्रांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण संचेती चौकातील उड्डाणपुलाच्या खांबावर चढून आंदोलन करतो आहे. इतक्या उंचावरून उडी मारण्याची तो धमकी देत असल्याचंही कळतंय. त्याच्या हातात एक फ्लेक्स असून त्यावर जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्यात यावी, असा मजकूर लिहिला आहे. या आंदोलनामुळं उड्डाणपूल परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. (latest pune news)

दरम्यान, घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून या तरुणाच्या बचावासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांनाही त्यानं उडी मारण्याची धमकी देत जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करावी ही आपली मागणी लावून धरली आहे. (latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT