Dr Sunil Bodhe sakal
पुणे

युवा एकत्र आले तर संपूर्ण विश्व शांतिमय होईल; नि. ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे

रामकृष्ण मठाच्या वतीने "राष्ट्रीय युवा दिन तसेच ''आझादी का अमृत महोत्सव'' निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशांत पाटील

रामकृष्ण मठाच्या वतीने "राष्ट्रीय युवा दिन तसेच ''आझादी का अमृत महोत्सव'' निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सिंहगड रस्ता - 'त्यागभाव आणि सेवाभाव" याचा आदर्श आत्ताच्या तरुण पिढीने (Youth Generation) आपल्या आचरणात आणला पाहिजे. भारत आध्यात्मिक देश असून येथे प्रेम आणि शांती (Peaceful) नांदते. युवा एकत्र आले तर संपूर्ण विश्व (World) शांतिमय होईल. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामीजींचे विचार प्रेरणादायी ठरले. जीवनात कधी हार मानू नका, आणि घाबरू नका, स्वामीजींच्या अशा विचारांमुळे प्रेरणा मिळाली. स्वामीजींचे विचार जास्तीत जास्त लोकांनी हे अवलंबिले पाहिजे. असे मत निवृत्त ब्रिगेडियर डॉ सुनील बोधे (Retired Brigadier Dr. Sunil Bodhe) यांनी व्यक्त केले.

रामकृष्ण मठाच्या वतीने "राष्ट्रीय युवा दिन तसेच ''आझादी का अमृत महोत्सव'' निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी आयोजित हा कार्यक्रम आरकेएम पुणे या युट्यूब चॅनल वर प्रसारित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, निवृत्त ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे, हैद्राबाद येथील व्हॅल्यू लॅब चे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन राव आणि उस्मानिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. सुमिता रॉय, आदींनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. व्यक्तीची, संस्थेची, राष्ट्राची प्रगती होण्यासाठी मनाची अध्यात्मिक प्रगतीही होणे तितकेच आवश्यक आहे. शांत व शुद्ध मन असणे अत्यंत जरुरीचे आहे. असे मत अर्जुन राव यांनी व्यक्त केले. "मनाची प्रगती व जडणघडण" या विषयावर स्वामी श्रीकांतानंद आणि अर्जुन राव यांच्या मध्ये संवाद झाला.

स्त्रियांना निर्णयाचे स्वातंत्र्य हवे. स्त्रियांची शैक्षणिक प्रगती आणि सबलीकरण यावरील स्वामीजींच्या विचारांचे विस्तृत विवेचन डॉ सुमिता रॉय यांनी केले.

स्वामीजींचे विचार सर्वांनी आचरणात आणले पाहिजेत व "वसुधैव कुटुंबकम्" हा बोध ठेवून आपणही आपला देश आणि विश्व शांतीपूर्ण बनविण्याकरिता प्रयत्न करूया असे मत स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केले.

स्वामीजींचे प्रेरक विचार आपल्या जीवनात आणावे. रामकृष्ण मठाने आदर्श जीवनपद्धती कशी असते, याबद्दल वारंवार मार्गदर्शन केलेले आहे आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समाजासमोर ठेवून हे संस्था वाटचाल करत आहे असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद, महापौर मोहोळ, नगरसेवक शंकर पवार, प्रज्योत तुंगारे, दामोदर रामदासी आदि मान्यवर उपस्थित होते. दामोदर रामदासी यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार नाट्य कृतीतून सादर केले. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांनी प्रास्ताविक करून आभार मानले या कार्यक्रमास युवक-युवती उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT