aundh11.jpg 
पुणे

पुण्यात अडकलेल्या मजुरांना मिळाला मदतीचा हात... 

सकाळवृत्तसेवा

औंध (पुणे) : रोजगारानिमित्त महाळुंगे (क्रीडानगरी) गावामध्ये राहणाऱ्या व लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील आठ मजुरांना मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ गावी पाठविण्यात आले. 

गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ हे सर्व नागरिक लॉकडाऊनमुळे महाळुंगे येथे अडकून पडले होते. हाताला काम नाही व घरी जायची सोय नसल्याने याची दखल घेऊन तुषार हगवणे यांनी मुळशी तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्या सकारात्मक मदतीतून त्यांना परवानगी मिळवून दिली. 

या सर्वांना निरोप देण्यासाठी मंडल अधिकारी हेमंत नायकवाडी, तलाठी हनुमंत चांदेकर, शिवसेनेचे मुळशी तालुका प्रमुख संतोष मोहोळ, उपसरपंच युवराज कोळेकर, माजी उपसरपंच अजिंक्‍य निकाळजे, युवा नेते रणजित पाडाळे, युवा नेते तुषार हगवणे हे उपस्थित होते. 

या सर्व नागरिकांना गावी जाण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता व सहकार्य युवा नेते तुषार हगवणे यांनी केले. यावेळी आपल्या मूळ गावी जात असलेल्या या सर्व नागरिकांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

SCROLL FOR NEXT