Rajgad_Fort 
पुणे

फोटो काढण्याचा छंद जिवावर बेतला; मित्रांची नजर चुकवून दरीत उतरला आणि...

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : राजगडावरुन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१४) सकाळी घडली. अनुराग अनिल राक्षे (वय अंदाजे २०, रा. भायखळा, मुंबई) असं या मृत तरुणाचं नाव आहे.

याबाबत वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.१४) रोजी मुंबई येथील सोळा जणांचा ग्रुप राजगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. हा ग्रुप पाली दरवाज्यामार्गे सकाळी किल्ल्यावर गेला. किल्ला फिरत असताना पद्मावती माचीजवळ फोटो काढताना अनुरागच्या वॉकी-टॉकीची बॅटरी खाली दरीत पडली. ती बॅटरी काढण्यासाठी अनुराग खाली उतरत होता. तेव्हा सोबतच्या मित्रांनी त्याला 'खाली जाऊ नको, दरी आहे' असे सांगितले होते. आणि त्या नंतर बाकीचे मित्र फोटो काढण्यासाठी इतर ठिकाणी गेल्यानंतर अनुराग बॅटरी काढण्यासाठी खाली उतरला. पाय घसरुन दरीत पडला.

त्यानंतर काही वेळानंतर मित्रांना अनुराग दिसला नाही. त्याची शोधाशोध केल्यानंतर बॅटरी पडल्याठिकाणी पाहिले असता तो खाली पडलेला दिसला. ग्रुपमधील मित्रांनी १०० नंबर कॉल करून किल्ल्यावर घडलेल्या अपघाताची माहिती सांगितली. त्यानंतर वेल्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि दरीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढले. यावेळी वेल्हेचे पोलिस हवलदार औंदुबर अडवाल, कॉन्स्टेबल अभय साळुंके, पोलिस पाटील बाळासाहेब रसाळ, पोलिस मित्र विकास घोरपडे, बाळू पवार आणि इतर स्थानिकांनी तरुणाला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात आणले. आणि तेथून करंजावणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण दवाखान्यात येण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वेल्हे पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. अधिक तपास वेल्ह्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलिस करत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT