Pune zp
Pune zp  
पुणे

पुणे : शोधत होते सरकारने नेमलेली कंपनी; सापडले मुलींचे वसतीगृह

सकाळ वृत्तसेवा

राज्याच्या ग्रामविकास विभागाने खास निविदा काढून स्वतंत्र कंपनीची नियुक्ती केली आहे.

पुणे - राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचे वस्तू व सेवा कर (जीएसटी), प्राप्तीकर विवरण (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने खास निविदा काढून स्वतंत्र कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीने कार्यालयाचा पत्ता पुण्यातील शिवाजीनगर येथील दिलेला आहे. पण प्रत्यक्षात या पत्यावर मुलीचे वसतीगृह असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले आहे. सरकारनेच नेमलेली कंपनी सापडत नसल्याने जीएसटी, आयकर रिटर्न भरायचे कसे, असा प्रश्‍न पुणे जिल्हा परिषदेसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेने याबाबत ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांना पत्र पाठवले आहे. ग्रामविकास विभागाने जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी नियुक्त केली असून, या कंपनीचा पत्ता ११७०, १३ ए, रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर पुणे असा दिलेला आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी या पत्त्याचा शोध घेत असताना, त्यांना या पत्यावर मुलींचे वसतिगृह आढळून आले आहे. शिवाय आजूबाजूला या कंपनीचा शोध घेऊनही ती सापडलेली नाही. त्यामुळे ही संस्थाच अस्तित्वात नसल्याचे आढळून आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

ही कंपनी सापडत नसल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेचे जीएसटी आणि इन्कम टॅक्स संदर्भातील विवरणपत्र भरण्यास विलंब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी प्राप्तीकर विवरणपत्र विलंबाबाबत मोठा दंड होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर या कंपनीचे कार्यालय नेमके कुठे आहे, त्याचा पत्ता, दूरध्वनी आणि ई-मेल आयडी पाठवावा, अशी मागणी प्रसाद यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT