Water supply to four villages was cut off sakal
पुणे

पुणे : बांधकाम पाडल अन चार गावचे पाणी झाले बंद

महापालिकेच्या कारवाईचा धसका नागरिक घेतात, पण आज मात्र एका कारवाईनंतर चक्क चार गावांचा पाणी पुरवठा बंद झाला

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेच्या कारवाईचा धसका नागरिक घेतात, पण आज मात्र एका कारवाईनंतर चक्क चार गावांचा पाणी पुरवठा बंद झाला. त्याचे झाले असे की महापालिकेने नांदेड गावातील एका नागरिकाचे अनधिकृत बांधकाम पाडले, त्यामुळे संतप्त झालेल्या या नागरिकाने त्यांच्या खासगी जागेतील विहिरीतून होणारा गावांचा पाणी पुरवठा बंद केला. गावाचे सरपंच, सदस्यांचे ते ऐकत नसल्याने अखेर महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन त्यांची समजूत घालून पाणी पुरवठा सुरू करून घेतला.(Water supply to four villages was cut off)

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, सणसनगर या गावांना नांदेड गावातील खासगी विहिरीतून सुमारे ३० वर्षापासून पाणी पुरवठा होत आहे. खडकवासला धरणातून कॅनॉलमधून येणारे पाणी या विहिरीमध्ये सोडले जाते, त्यानंतर तेथून गावांमध्ये जलवाहिनीतून पोचवले जाते. ही विहीर खासगी असली तरी जागा मालक त्याचे कोणतेही शुल्क घेत नाहीत.(Water supply)

महापालिकेने शुक्रवारी (ता. ३०) त्यांचे नांदेड गावातील अनधिकृत बांधकाम पाडले, त्यामुळे त्यांनी संतापाच्या भरात विहिरीवरील पंपिंग बंद केल्याने या चार गावातील पाणी पुरवठा बंद झाला. पाणी नसल्याने गावामध्ये ओरड सुरू झाली, गावातील पुढाऱ्यांनी या जागा मालकांकडे पाणी सुरू करण्याची विनंती केली, पण मला ठोस आश्‍वासन दिल्याशिवाय पाणी सुरू करणार नाही असे सांगितले. तसेच फक्त महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असे सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी नांदेड गावात जाऊन या जागामालकाची समजूत घातली.

गेल्या ३० वर्षापासून तुम्ही मोफत विहीर वापरू देत आहात हे चांगले काम आहे. पण नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पंपिंग सुरू करावी अशी विनंती केली. त्यानंतर जागा मालकानेही विनंती मान्य करत पाणी पुरवठा सुरू केल्याने गावांचा पाणी पुरवठा दुपारनंतर सुरू झाला.नांदेड येथे जाऊन आम्ही या जागामालकाचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनीही आमची मागणी मान्य करून पाणी पुरवठा सुरू केला. त्यांची अडचण सोडविण्यासाठी जागा मालकास महापालिकेत बोलविले आहे.’’, असे पावसकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT