Anil Vij Esakal
Punjab Assembly Election 2022

...म्हणून केजरीवाल पंजाबमध्ये निवडून आले; हरियाणा मंत्र्यांचा निशाणा

पंजाबमध्ये 'आप'ने दारू विकली आहे-अनिल विज

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात चार राज्यात भाजपने आपला झेंडा रोवला आहे. मात्र पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांच्या (Arvind Kejariwal) आम आदमी पक्षाने (AAP) आतापर्यंत जवळपास ९१ जागांवर आघाडी मिळवली आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला मात्र (Congress) मोठा धक्का बसला आहे. केजरीवाल यांच्या विजयाने मात्र चर्चेला उधान आलं आहे. हरियाणाचे (Haryana) आरोग्य मंत्री अनिल विज (Health Minister Anil Vij) यांनी आपच्या विजयावर निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये 'आप'ने दारू विकली आहे असा आरोप विज यांनी केला आहे.

अनिल विज यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, चार राज्यांमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागला आहे. फक्त पंजाबमध्ये 'आप'चा कल दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पंजाबमध्ये 'आप'ने दारू विकली आहे. त्यांचा हा व्यवसाय खूप मोठा आहे. म्हणूनच पंजाबचे नागरीक कौतुक करत आहेत अशी टीका अनिल विज यांनी केली आहे.

चार राज्यांमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागला आहे. फक्त पंजाबमध्ये 'आप'चा कल दिसत आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आपने मोठी मुसंडी मारली आहे. आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेस उमेदवारापेक्षा मान यांना जवळपास ३० हजार अधिक मतांची आघाडी आहे. अशा परिस्थिती पंजाबमध्ये आपचे सरकार येणार हे निश्चित झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT