Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu Team eSakal
Punjab Assembly Election 2022

Punjab Election : सिद्धूविरोधात बहिणीची महिला आयोगाकडे तक्रार

सकाळ डिजिटल टीम

Punjab Election 2022 : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात त्यांची NRI बहीण सुमन तूर यांनी महिला आगोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभा (Punjab Assembly Election 2022) निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्याआधी सिद्धू पुन्हा एकदा कौटुंबिक वादात अडकताना दिसून येत आहेत. सिद्धूने माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून बदनामीकारक, बेताल आणि खोटी विधाने केल्याचे म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Suman Toor Complaint Against Navjot Sing Sidhu)

सुमन तूर म्हणाल्या की, मी पंजाबमधील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. पण माझे वडील भगवंत सिंग सिद्धू यांच्या निधनानंतर माझा एकुलता एक भाऊ नवज्योत सिंग याने आजारी आई निर्मल भगवंत यांना आता इथे काहीच नाही असे सांगून घरातून हाकलून दिले. यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकावर त्यांचा मृत्यू झाला. माझी बदनामी करण्यात आली असून माझा मानसिक छळ करण्यात आलयाचे सुमन यांनी म्हटले आहे.

सिद्धू यांची बहीण सुमन तूर नुकत्याच अमेरिकेहून चंदीगडला पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात त्यांनी नवज्योत सिद्धूने आई-वडील न्यायिकदृष्ट्या वेगळे झाल्याचे खोटे विधान केले होते. तसेच नवज्योतसिंग सिद्धू अत्यंत निर्दयी असल्याचे म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT