The Central Government announces a big Diwali gift — employees can now withdraw 100% of their PF amount as per the latest EPFO decision.

 

esakal

Sakal Money

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

EPFO latest decision News : केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सीबीडीटीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय!

Mayur Ratnaparkhe

Central Government’s Diwali Gift for Employees: नोकरदारवर्गास दिवळीच्या आधी केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी मिळणार आहे. EPFO अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता पीएफ खात्यांमधून पात्र शिल्लक रकमेच्या १०० टक्के रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे.

 कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळावा यादृष्टीने आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण वाढवण्याच्या दिशेने हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) २३८ व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. कर्मचारी आता त्यांच्या पीएफ खात्यांमधून कर्मचारी आणि नियोक्ता यांचे पूर्ण वाटा काढू शकतो. आधी ही रक्कम केवळ निवृत्ती किंवा बेरोजगारीच्या परिस्थितीच काढणे शक्य होते.

याव्यतिरिक्त आता केंद्र सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर संबंधित फंड्सवरील व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी जीपीएफवरील व्याजदर ७.१टक्के राहील.

जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) ही केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अनिवार्य बचत योजना आहे जी त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. केवळ सरकारी कर्मचारी जे केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी सेवेत आहेत  तेच या योजनेत सामील होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

Pune News : बेपत्ता दोन मुली सुखरूप सापडल्या; पाचशे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले

SCROLL FOR NEXT