NHAI introduces a simplified FASTag KYC update process for vehicle owners to ensure seamless toll payment and account verification.

 

esakal

Sakal Money

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

NHAI simplifies KYC process for FASTag users : कागदपत्रे अपलोड करण्याचा त्रास नाही किंवा खाते बंद होण्याची भीतीही नाही!

Mayur Ratnaparkhe

NHAI’s New Step to Simplify FASTag KYC Process : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) FASTag वापरकर्त्यांसाठी KYC प्रक्रिया अधिक सोपी केली आहे. यामुळे आता अनावश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचा त्रास आता नाही किंवा खाते बंद होण्याची भीतीही नाही! नवीन नियमांमुळे, ग्राहकांसाठी FASTag पडताळणी सोपी आणि जलद झाली आहे.

जाणून घ्या काय आहे नवा नियम? –

इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, KYC प्रक्रियेसाठी आता वाहनाचा बाजूचा फोटो आवश्यक राहणार नाही. याचा अर्थ असा की वाहनाचा फक्त समोरचा फोटो अपलोड करावा लागेल, ज्यामध्ये FASTag आणि नंबर प्लेट स्पष्टपणे दिसेल. शिवाय, वापरकर्त्याने वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाकताच, सिस्टम 'वाहन पोर्टल' वरून वाहनाचा RC डेटा स्वयंचलितपणे मिळवेल.

 जर एका व्यक्तीच्या नावाने किंवा मोबाईल नंबरने एकापेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली असेल, तर ते कोणत्या वाहनासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ते निवडू शकतील. यामुळे चुकीची माहिती किंवा कागदपत्रे अपलोड करण्याची शक्यता राहणार नाही.

नवीन केवायसी नियम लागू झाले असले, तरी जुन्या फास्टॅग वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण, एनएचएआयने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत गैरवापर किंवा अनियमिततेच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत जुने फास्टॅग सक्रिय राहतील. तथापि, बँका वेळोवेळी वापरकर्त्यांना त्यांचे केवायसी पूर्ण करण्याची आठवण करून देणारे एसएमएस अलर्ट पाठवतील.

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाइटनुसार, केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर वाहनाचे केवायसी अपूर्ण किंवा चुकीचे आढळले तर बँक फास्टॅगला 'हॉटलिस्ट' करू शकते, म्हणजेच टॅग काम करणे थांबवेल आणि तुम्हाला टोलवर रोख पैसे द्यावे लागतील. यानंतर मग योग्य कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर, फास्टॅग पुन्हा सक्रीय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT