Flight Booking esakal
Sakal Money

Flight Booking : आता फ्लाइट रद्द झाल्यास परत मिळणार पूर्ण पैसे, असं करा बुकिंग

विमानाचे तिकीट काढल्यानंतर अचानक प्रवासाचा बेत बदलल्यास प्रवाशाचे मोठे आर्थिक नुकसान होते

सकाळ डिजिटल टीम

Flight Booking : विमानाचे तिकीट काढल्यानंतर अचानक प्रवासाचा बेत बदलल्यास प्रवाशाचे मोठे आर्थिक नुकसान होते. आता मात्र विमान तिकीट रद्द करण्याची वेळ आल्यास प्रवाशांनी काळजी बाळगायची गरज नाही. कारण तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे परत मिळू शकतात.

पण यासाठी तुम्हाला ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस अर्थात पेटीएमद्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्याची गरज आहे. कारण ही सुविधा फक्त पेटीएम युझर्ससाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पेटीएमच्या मदतीने तुम्ही फ्लाइट किंवा बसचं तिकीट रद्द केल्यावर पूर्ण परतावा मिळवू शकता. पेटीएमच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही फ्लाइट किंवा बसच्या तिकिटावर कोणतेही कॅन्सलेशन चार्ज आकारला जात नाही. म्हणूनच ही सुविधा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

पेटीएमच्या या प्लॅनचं नाव आहे Cancel Protect Premium. कॅन्सल प्रोटेक्ट प्रीमियमच्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, ग्राहक फ्लाइट तिकिटांसाठी 149 रुपये आणि बस तिकिटांसाठी 25 रुपयांचा प्रीमियम भरून 'कॅन्सल प्रोटेक्ट' खरेदी करू शकतात.

पेटीएम कॅन्सल प्रोटेक्ट कसं काम करतं?

तर पेटीएमची कॅन्सल प्रोटेक्ट प्रीमियम योजना ग्राहकांना पेटीएमद्वारे रद्द केलेल्या ट्रिपसाठी फ्लाइटच्या शेड्यूल्ड डिपार्चर टाइमच्या किमान 24 तास आधी आणि बसेसच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान 4 तास आधी 100% परतावा दावा करते. कंपनीचा दावा आहे की 'कॅन्सल प्रोटेक्ट' सोबत रिफंडच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही आणि रद्द केल्यावर तिकीट बुक करण्यासाठी ज्या खात्यातून पैसे भरले गेले होते त्या खात्यात तुमचे पैसे त्वरित जमा केले जातील.

पेटीएमच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कंपनीने अॅपवर अनेक कस्टमर-फ्रेंडली प्रोडक्ट फीचर्स सादर केले आहेत, ज्यामुळे प्रवास बुकिंग सुलभ झालं आहे. शिवाय भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन हे फीचर्स देण्यात आले आहेत. 'कॅन्सल प्रोटेक्ट' हे प्रवाशांसाठी फ्लेकजिबल आणि सोयीस्कर ऑप्शन आहे. तिकिटांच्या सुविधेसह, युजर्सना ट्रॅव्हल बुकिंगवर मोठ्या डील आणि ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अधिक बचत करण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT