Income Tax Refund Sakal
Personal Finance

Income Tax Refund: ITR भरल्यानंतरही 31 लाख लोकांना मिळणार नाही इन्कम टॅक्स रिफंड, काय आहे कारण?

Income Tax Refund: 31 लाख लोकांना पुन्हा ITR भरावा लागणार?

राहुल शेळके

ITR Update : बर्‍याच करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी 2023-24 किंवा आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरले होते, परंतु त्यांच्या ITR ची पडताळणी झाली नाही.

आता या करदात्यांना परताव्यासाठी पात्र मानले जाणार नाही, कारण आयटी विभागाच्या नियमांनुसार, सर्व करदात्यांना त्यांच्या आयटीआरची पडताळणी करणे बंधनकारक आहे.

जर करदात्याने आयकर रिटर्नची पडताळणी केली नाही, तर आयटीआर भरलेला मानला जाणार नाही. आयकर विभाग आयटीआर दाखल केल्यानंतर पडताळणीसाठी 30 दिवसांचा वेळ देतो.

पडताळणी न केल्यास आयकर विभाग परताव्यासाठी प्रक्रिया करणार नाही. अशा परिस्थितीत या करदात्यांना पुन्हा आयकर विवरणपत्र भरावे लागणार आहे.

31 लाख लोकांना परतावा मिळणार नाही!

प्राप्तिकर वेबसाइटनुसार, 23 ऑगस्टपर्यंत 6.91 कोटींहून अधिक लोकांनी रिटर्न भरले होते, परंतु केवळ 6.59 कोटी करदात्यांनी त्यांच्या आयटीआरची पडताळणी केली आहे.

उर्वरित 31 लाख लोकांचे रिटर्न पडताळलेले नाहीत. यापैकी काही करदात्यांना पडताळणीसाठी 30 दिवसांचा वेळ आहे, तो लवकरच संपणार आहे. प्राप्तिकर विभागाने या लोकांना लवकरात लवकर पडताळणी (व्हेरिफिकेशन) करून घेण्याचा इशारा दिला आहे.

आयकर विभागाने ही माहिती दिली

बुधवारी एक्स प्लॅटफॉर्मवर एका ट्विटद्वारे, आयकर विभागाने सांगितले की, तुमचा आयटीआर 3-30 दिवसांच्या आत पडताळणी करा, अन्यथा तुम्हाला पुन्हा रिटर्न भरावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल.

आता ITR भरण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल?

आयकर विभागाने 2023-24 मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै दिली होती. यानंतर विलंबित आयटीआर दाखल करण्याची परवानगी आहे.

ITR उशीरा भरण्यासाठी विलंब शुल्क भरावे लागते. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना 1,000 रुपये आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना 5,000 रुपये उशीरा भरावे लागतील.

ITR पडताळणी कशी करावी?

तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर आधार नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठवून ITR पडताळणी करू शकता. याशिवाय, नेटबँकिंग आणि ऑफलाइन मोडद्वारे देखील ITR पडताळणी केली जाऊ शकते.

आधार OTP द्वारे पडताळणीसाठी तुम्हाला पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यानंतर 'ई-व्हेरिफाय रिटर्न' वर जावे लागेल. आता तुम्हाला ज्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करायचे आहे ते माध्यम निवडा आणि पडताळणी (व्हेरिफिकेशन) पूर्ण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT