97.69 Percent Of Rs 2000 Currency Notes Returned To Banking System says RBI  Sakal
Personal Finance

2000 Rupee Notes: दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत; ८,२०२ कोटी रुपयांच्या नोटा येणे बाकी

2000 Rupee Notes: बँकिंग व्यवस्थेत आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत आल्या असून, केवळ ८२०२ कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली.

राहुल शेळके

2000 Rupee Notes: बँकिंग व्यवस्थेत आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत आल्या असून, केवळ ८२०२ कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली.

त्यावेळी चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य, ३.५६ लाख कोटी रुपये होते. ते २९ मार्च २०२४ च्या अखेरीस ८२०२ कोटी रुपयांवर घसरले आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा आहेत. अजूनही नागरिक त्यांच्याकडे असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील १९ कार्यालयांमध्ये जमा करू शकतात किंवा बदलून घेऊ शकतात.

नागरिक त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अशा नोटा कोणत्याही पोस्ट ऑफिसमधूनही रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवू शकतात. रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये अशा नोटा जमा करण्याची सुविधा आठ ऑक्टोबर २०२३पासून सुरू करण्यात आली आहे.

देशातील आरबीआयची ही १९ कार्यालये आहेत

लोकांना ८ ऑक्टोबर २०२३ पासून आरबीआयच्या १९ कार्यालयांमध्ये नोटा बदलून घेण्याचा किंवा त्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

१९ कार्यालये अहमदाबाद, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम येथे आहेत.

२,००० रुपयांची नोट कधी सुरू झाली?

२,००० रुपयांची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये बाजारात दाखल झाली होती. ही नोट अशा वेळी बाजारात आली जेव्हा सरकारने चलनात असलेल्या सर्वात मोठ्या नोटा म्हणजे ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली.

८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बेकायदेशीर घोषित केल्या होत्या आणि ५००​​ आणि २,००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याची घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT