After MDH and Everest controversy, Centre orders all state governments to test spices for quality check ras98 Sakal
Personal Finance

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

MDH Everest Controversy: भारतातून निर्यात होणारे मसाले, विशेषत: MDH आणि EVEREST मसाल्यांवरील अलीकडील वादानंतर, केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना मसाल्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल शेळके

MDH Everest Controversy: भारतातून निर्यात होणारे मसाले, विशेषत: MDH आणि EVEREST मसाल्यांवरील अलीकडील वादानंतर, केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना मसाल्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) नियमित नमुने घेणे सुरू केले असले तरी, या किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थांकडून मसाल्याच्या गुणवत्तेबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

अहवालानुसार, उत्तराखंडच्या बाबतीत, राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. आर. राजेश कुमार यांनी उत्तराखंडमध्ये मसाल्यांची चाचणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तराखंडमध्ये 50 हून अधिक मसाले उत्पादक कंपन्या आहेत. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणाले की, सर्व 13 जिल्ह्यांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना विविध मसाल्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी मसाले उत्पादक कंपन्यांना भेट देऊन नमुने गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बुधवारी एका अहवालाचा हवाला देत, पीटीआयने म्हंटले आहे की MDH आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे भारतातील निम्म्याहून अधिक मसाल्यांच्या शिपमेंटला धोका निर्माण होऊ शकतो.

अलीकडेच, फूड स्टँडर्ड्स ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड (FSANZ) ने मंगळवारी जाहीर केले की ते MDH आणि एव्हरेस्ट या भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या मसाल्यांच्या मिश्रणाशी संबंधित आरोपांची चौकशी करत आहेत.

MDH आणि Everest या दोन भारतीय मसाल्यांचे ब्रँड केवळ देशातच नव्हे तर जगभरात वापरले जातात आणि म्हणूनच त्यांची मागणी खूप जास्त आहे. जर आपण MDH बद्दल बोललो, तर आज तो जगातील मसाल्यांच्या सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक आहे आणि कंपनी विविध प्रकारचे मसाले तयार करते आणि कंपनी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करते.

जगातील 100 हून अधिक देशांमध्ये कंपनीचे मसाले वापरले जातात, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, MDH कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स एका दिवसात 30 टनांपेक्षा जास्त मसाले तयार करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Sangli Theft Cases : सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली, भर बाजारात चोरांनी दिलं पोलिसांना आव्हान

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT