Akshaya Tritiya 2024 digital gold how it works where to buy check details discover Sakal
Personal Finance

Akshaya Tritiya 2024 : आजच्या दिवशी सोन्यात केलेली गुंतवणूक देईल जास्त फायदा; कशी कराल डिजिटल खरेदी!

Akshaya Tritiya 2024 : गुंतवणूक म्हणून सोन्यात खरेदी करण्याला भारतीयांकडून आधीपासूनच पसंती दिली जाते. लोक खासकरून दुकानात जाऊन सोन्याचे दागिने अथवा नाणी खरेदी करतात. मात्र, आता सोने ऑनलाइन खरेदी-विक्रीचे प्रमाण देखील वाढले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akshaya Tritiya 2024 : गुंतवणूक म्हणून सोन्यात खरेदी करण्याला भारतीयांकडून आधीपासूनच पसंती दिली जाते. लोक खासकरून दुकानात जाऊन सोन्याचे दागिने अथवा नाणी खरेदी करतात. मात्र, आता सोने ऑनलाइन खरेदी-विक्रीचे प्रमाण देखील वाढले आहे. डिजिटल गोल्ड काय आहे व यात गुंतवणूक कशी कराल, याबाबत जाणून घेऊया.

सुरक्षित गुंतवणुकीचा एक प्रकार म्हणून सर्वप्रथम नजरेसमोर येते ती सोन्यातील गुंतवणूक. शेअर बाजार कोसळला तर सोन्याच्या किमती वाढतात आणि पर्यायाने आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही वाढतो. जर आपल्या उत्पन्नातील सात ते पंधरा टक्के रक्कम सोन्यात गुंतवली तर ही गुंतवणूक आपल्या नक्कीच फायद्याची ठरते. सध्या डिजिटल गोल्डचा पर्याय जोमात सुरू आहे.

देशातील पारंपारिक गुंतवणूकदार, खरेदीदार सराफ बाजारात जाऊन सोने खरेदी, फिजिकल गोल्ड खरेदीला पसंती देतात. अनेक ग्राहकांना डिजिटल गोल्डची माहिती नाही. अथवा त्यांना हा पर्याय विश्वसनीय वाटत नाही. सध्याच्या काळात सोन्यात गुंतवणुकीसाठी सॉव्हेरिन गोल्ड बाँड आणि गोल्ड ईटीएफसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोन्याच्या दागिन्यापेक्षा डिजिटल गोल्डमध्ये अधिक परतावा मिळण्याची दाट शक्यता असते.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचा पर्याय

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सॉव्हेरिन गोल्ड बाँड हा चांगला पर्याय आहे. हा एक प्रकारचा पेपर गोल्ड वा डिजिटल गोल्ड आहे. यामध्ये ग्राहकाला सोने खरेदीचे, गुंतवणुकीचे प्रमाणपत्र मिळते. त्यावर त्यावेळचा भाव नोंदवलेला असतो. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 मध्ये सॉव्हेरिन गोल्ड बाँड योजना सुरु केली होती. यामध्ये ग्राहकाला 1 ग्रॅम सोने खरेदी करता येते. यामध्ये गुंतवणुकीवर फायदा तर होतोच, पण दरवर्षी 2.5 टक्के व्याज ही मिळते.

गोल्ड खरेदीसाठी काय करावे लागते

डिजिटल सोने हा सोन्यात गुंतवणुकीचा एक आभासी मार्ग आहे. यामध्ये तुम्ही 1 हजारांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही मोबाइल वॉलेट कंपनीकडे ऑनलाइन नोंदणी करून डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.

किती केली जाऊ शकते गुंतवणूक

तुम्ही कुठूनही आणि केव्हाही डिजिटल गोल्डचे युनिट खरेदी करू शकता आणि कर्ज घेण्यासाठी ते तारण म्हणूनही वापरू शकता. ज्यावेळी तुम्ही डिजिटल सोने खरेदी करता किंवा विकता तेव्हा तुम्हाला त्या वेळचे बाजारमूल्य मिळते. डिजिटल सोने खरेदी करण्यासाठी काही मर्यादा आहेत. बहुतांश ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.

PhonePe Digital Gold

  • आधी तुमचे PhonePe अकाउंट सेट करा.

  • त्यानंतर स्क्रोलकरून इन्वेस्टमेंट कॅटेगरीमध्ये जा.

  • त्यानंतर Buy 24K Gold वर क्लिक करा.

  • आता लिस्टमधील खरेदी करायचे आहे ते गोल्ड कॉइन निवडा.

  • येथे तुम्ही रक्कम देखील सहज टाकू शकता. विशेष म्हणजे १ रुपयात देखील सोने खरेदी करता येईल.

  • त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटद्वारे पेमेंट करा.

Google Pay वरून करा Digital Gold खरेदी

  • आधी गुगल पे अकाउंट सेट करा व तुमच्या बँक खात्याशी लिंक करा.

  • त्यानंतर स्क्रोल करून गोल्ड लॉकरवर या.

  • आता Buy Gold वर क्लिक करा व खरेदी करण्यासाठी रक्कम टाका.

  • तुम्ही या सोन्याची कधीही विक्री करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT