Spice Jet
Spice Jet Sakal
Personal Finance

Spice Jet: गो फर्स्टची दिवाळखोरी स्पाईसजेटसाठी ठरली दिवाळी! 25 विमाने आणणार सेवेत, अशी असेल स्पाईसजेटची योजना

राहुल शेळके

Spice Jet Plans: गो फर्स्टच्या दिवाळखोरी नंतर स्पाईसजेटने मोठा निर्णय घेतला आहे. स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग म्हणाले की, विमान कंपनी आपल्या ग्राउंड फ्लीटची सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी काम करत आहे.

स्पाईसजेट 25 विमानांची सेवा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. या योजनेसाठी स्पाईसजेट कंपनीने आधीच सुमारे 400 कोटी रुपये जमा केले आहेत.

"एअरलाइनला मिळालेला बहुतांश ECLGS निधी यासाठी वापरला जाईल, ज्यामुळे आम्हाला आगामी काळात जास्तीत जास्त वाढ करण्यात मदत होईल," असेही ते म्हणाले. (Amid Go First bankruptcy, SpiceJet plans to revive 25 grounded aircraft)

वाडिया समूहाची विमान कंपनी गो फर्स्ट दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीने NCLT मध्ये ऐच्छिक दिवाळखोरीच्या कार्यवाहीसाठी अर्ज केला आहे. पीटीआयने कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

कौशिक खोना म्हणाले की, एअरलाइनची निम्म्याहून अधिक विमाने उडू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे इंजिन निर्माता प्रॅट अँड व्हिटनी (प्रॅट अँड व्हिटनी) यांनी त्याचा पुरवठा बंद केला आहे.

त्यामुळे कंपनीकडे पैशांची मोठी कमतरता आहे. विमान कंपनीचा निधी संपला आहे. यामुळे ते तेल कंपन्यांची थकबाकी भरू शकत नाहीत. या कंपन्यांनी त्यांना तेल देण्यास नकार दिला आहे.

3 आणि 4 मे रोजी गो फर्स्टची सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खोना म्हणाले की, दिवाळखोरी जाहीर करणे हा एक दुर्दैवी निर्णय होता.

परंतु कंपनीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. विमान कंपनीनेही याबाबत सरकारला देखील कळवले आहे. यासोबतच हा सर्वसमावेशक अहवाल नागरी विमान वाहतूक नियामक DGCA लाही देणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT