Gautam Adani Sakal
Personal Finance

Asia Richest Person: श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची घसरण; चीनचा अब्जाधीश दुसऱ्या क्रमांकावर

गौतम अदानींनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान गमावले आहे.

राहुल शेळके

Asia Richest Person: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. गौतम अदानींची श्रीमंतांच्या यादीत घसरण झाली आहे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान गमावले आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात गौतम अदानी आता 18 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर घसरले आहेत आणि त्यांनी चीनचे अब्जाधीश झोंग शैनशैन यांना मागे टाकले आहे.

अब्जाधीशांच्या यादीत 19 व्या क्रमांकावर घसरल्याने गौतम अदानी यांच्यासमोर जगातील टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

चीनचे अब्जाधीश झोंग शैनशैन 62.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 18 व्या स्थानावर पोहोचला आहे, गेल्या आठवड्यात त्यांच्या संपत्तीत 1.18 अब्ज डॉलरची भर पडली आहे.

भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीत या कालावधीत 662 दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे, त्यामुळे ते 18 व्या स्थानावरून 19 व्या स्थानावर घसरले आहेत. (Asia Richest Person)

टॉप-20 श्रीमंतांमध्ये फक्त 3 आशियाई अब्जाधीश:

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये सध्या आशियातील तीन अब्जाधीश आहेत आणि पहिले नाव 13 व्या स्थानावर असलेल्या मुकेश अंबानी यांचे आहे. त्यांची एकूण संपत्ती 84.6 अब्ज डॉलर आहे आणि गेल्या आठवड्यात त्यांची संपत्तीही कमी झाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 166 दशलक्ष डॉलरची घट झाली आहे. अशाप्रकारे, ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात मुकेश अंबानी 13व्या स्थानावर, झोंग शानशान 18व्या स्थानावर आणि गौतम अदानी 19व्या स्थानावर आहेत.

या तीन अब्जाधीशांचा जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, आशियाई श्रीमंतांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आशियातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांमध्ये विराजमान आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत माणूस अब्जाधीश कोण?

इलॉन मस्क 199 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानावर बर्नार्ड अर्नॉल्ट, तिसऱ्या स्थानावर जेफ बेझोस, चौथ्या स्थानावर बिल गेट्स, पाचव्या स्थानावर लॅरी एलिसन, सहाव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मर, सातव्या स्थानावर वॉरेन बफे, आठव्या स्थानावर लॅरी पेज, नवव्या स्थानावर सर्जे ब्रिन यांचा समावेश आहे.

मार्क झुकेरबर्ग दहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे जगातील दहा श्रीमंत अब्जाधीशांपैकी नऊ जण अमेरिकेतील आहेत. फक्त दुसऱ्या क्रमांकावर असलेले बर्नार्ड अर्नॉल्ट हे गैर-अमेरिकन आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट हे फ्रान्सचे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: शाळांत मराठी अनिवार्य, तरीही गळचेपी सुरूच; सीबीएसई शाळांतील सत्य परिस्थिती समोर

Edible Oil Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी मोठी वाढ; आता एक लिटरसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

RCB vs CSK: दिनेश कार्तिकने खरंच अंपायरला पाटिदारचं ड्रिंक पिण्यावरून झापलं? समोर आलंय वेगळंच कारण; Video Viral

Marathi Folk Artist Death : लोककलेचा बुलंद आवाज हरपला! ज्येष्ठ कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन; औरंगजेबाची 'ती' भूमिका ठरली होती अजरामर

Arjun Tendulkar कसा आहे? साराने चार शब्दांत जगासमोर जाहीर केले… आता सोशल मीडियावर नवीन चर्चा...

SCROLL FOR NEXT