Ayodhya Ram Mandir can become India's Mecca and Vatican of domestic and global tourist hub  Sakal
Personal Finance

Ayodha Ram Mandir: श्रीरामामुळे ‘यूपी’ बनणार धनवान; अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज

Ayodha Ram Mandir: अयोध्यानगरीमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारला २०२५ या आर्थिक वर्षात २० हजार ते २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त कर महसूल मिळू शकेल, असे अहवालात नमूद केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ayodha Ram Mandir: अयोध्यानगरी आणि रामलल्लाचे मंदिर हे उत्तर प्रदेशच्या (यूपी) अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) च्या संशोधनानुसार अयोध्यतून राज्याला २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. ‘एसबीआय’प्रमाणेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी राममंदिरामुळे उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

‘व्हेअर लॅटिन अमेरिका मिट्स स्कॅंडिनेव्हिआ ः द रोड टू सॅलव्हेशन पासेस थ्रू उत्तर प्रदेश’ या शीर्षकाचा संशोधन अहवाल ‘एसबीआय’ने प्रसिद्ध केला आहे.

अयोध्येतील राममंदिर पूर्ण होणे आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘यूपी’ सरकारने घेतलेला पुढाकार यातून उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून (स्थानिक आणि परदेशी) होणाऱ्या खर्चाचा चार लाख कोटींचा टप्पा या वर्षाच्या अखेरीस ओलांडू शकतो.

देवस्थाने आणि उत्पन्न

पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारला २०२५ या आर्थिक वर्षात २० हजार ते २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त कर महसूल मिळू शकेल, असे अहवालात नमूद केले आहे.

मक्का, व्हॅटिकन सिटीला मागे टाकणार

उत्तर प्रदेशसाठी अयोध्या मैलाचा दगड ठरणार असून राज्यातील पर्यटनातील वाढीचा अंदाज गृहित धरता या वर्षात राज्याच्या तिजोरीत चार लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. ‘जेफरिज’ या परदेशी शेअर बाजार संशोधन संस्थेच्या अंदाजानुसार मक्का आणि व्हॅटिकन सिटीपेक्षा अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असेल.

रामलल्लाच्या दर्शनासाठी दरवर्षी पाच कोटी भाविक अयोध्येत येतील. यामुळे अयोध्या हे केवळ ‘यूपी’मध्येच नव्हे तर भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनेल, असे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये निवडणुकीआधी 'I.N.D.I.A' आघाडीला मोठा झटका!, आता ‘या’ मित्रपक्षाचाही स्वबळाचा नारा

Crime: पतीचा अश्लील व्हिडिओ बनवला; नंतर पत्नीनं धमकावलं अन्...; जे घडलं त्यानं सर्वच हादरले, प्रकरण काय?

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर आता अनलिमिटेड मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनी आणतेय 'मंथली लिमिट'

AFG vs PAK: पाकड्यांचे शेपूट वाकडे! अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंना मारल्यानंतरही मालिका खेळणवण्यार ठाम; म्हणतात...

Vashi Farmers Protest : पवनचक्कीच्या अधिका-यांना काम करण्यास मज्जाव करुन रोखुण धरणा-या ७० शेतक-यावर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT