Bank Holidays  Sakal
Personal Finance

September Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, ‘इतके' दिवस बँका राहणार बंद, पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays in September: सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत.

राहुल शेळके

Bank Holidays in September: बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. खात्यातून पैसे काढण्यापासून ते पैसे जमा करणे, जुन्या नोटा बदलणे इत्यादीसाठी बँकेत जावे लागते.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांची यादी जरूर पहा.

सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. सार्वजनिक क्षेत्राव्यतिरिक्त खासगी आणि सहकारी बँकांनाही ही सुट्टी असेल.

सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँका बंद राहतील

भारतात काही दिवसात सणासुदीला सुरुवात होणार आहे, सप्टेंबर महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत. या महिन्यात कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत.

अशा स्थितीत या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहूनच नियोजन करा, अन्यथा तुम्हाला नंतर खूप त्रास सहन करावा लागू शकतो.

सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी:

  • 3 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 6 सप्टेंबर 2023- भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पाटणा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बँका बंद राहतील.

  • 7 सप्टेंबर 2023- श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे अहमदाबाद, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, तेलंगणा, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँक सुट्टी असेल.

  • 9 सप्टेंबर 2023- दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 10 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

  • 17 सप्टेंबर 2023- रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 18 सप्टेंबर 2023- विनायक चतुर्थीमुळे बेंगळुरू, तेलंगणा येथे बँका बंद राहतील.

  • 19 सप्टेंबर 2023- गणेश चतुर्थीमुळे अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील.

  • 20 सप्टेंबर 2023- कोची आणि भुवनेश्वरमध्ये गणेश चतुर्थी आणि नुआखाईमुळे बँका बंद राहतील.

  • 22 सप्टेंबर 2023- श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त कोची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.

  • 23 सप्टेंबर 2023 - चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

  • 24 सप्टेंबर 2023- रविवारमुळे बँका बंद राहतील.

  • 25 सप्टेंबर 2023- श्रीमंत शंकरदेव यांच्या जयंतीनिमित्त गुवाहाटीतील बँकांना सुट्टी असेल.

  • 27 सप्टेंबर 2023- मिलाद-ए-शरीफनिमित्त जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँका बंद राहतील.

  • 28 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलादमुळे अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, तेलंगणा, इम्फाळ, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची येथे बँका बंद राहतील. .

  • 29 सप्टेंबर 2023- ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.

बँका बंद असताना ग्राहकांनी काय करावे?

सप्टेंबरमध्ये सणासुदीमुळे बँकांना सुट्या आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या दरम्यान रोख रक्कम हवी असेल तर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. याशिवाय तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT