bikanerwala founder lala kedarnath agarwal passed away  Sakal
Personal Finance

Kedarnath Agarwal Passed Away: बिकानेरवालाचे संस्थापक केदारनाथ अग्रवाल यांचे दुःखद निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kedarnath Agarwal Passed Away: प्रसिद्ध मिठाई विक्रेते बिकानेरवालाचे संस्थापक लाला केदारनाथ अग्रवाल यांचे निधन झाले आहे.

राहुल शेळके

Kedarnath Agarwal Passed Away: प्रसिद्ध मिठाई विक्रेते बिकानेरवालाचे संस्थापक लाला केदारनाथ अग्रवाल यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. बिकानेरवाला यांची भारतात 60 हून अधिक दुकाने आहेत. त्यांचे आउटलेट्स अमेरिका, न्यूझीलंड, सिंगापूर, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या देशांमध्ये देखील आहेत. केदारनाथ अग्रवाल यांनी आपला व्यवसायिक प्रवास दिल्लीतून सुरू केला होता.

बिकानेरवाला ग्रुपचे एमडी श्याम सुंदर अग्रवाल म्हणाले की, त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्व आम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे. लाखो भारतीयांना तीच शुद्धता आणि चव अनुभवावी असा आमचा प्रयत्न असेल.

'बिकानेरवाला'चा असा आहे प्रवास

अग्रवाल 1950 च्या दशकाच्या सुरूवातीला आपला भाऊ सत्यनारायण अग्रवाल यांच्यासोबत दिल्लीला आले. सुरुवातीला जुन्या दिल्लीत दोन्ही भावांनी रसगुल्ले विकले. अग्रवाल बंधूंचे कठोर परिश्रम आणि बिकानेरच्या अनोख्या चवीमुळे लवकरच दिल्लीतील लोकांमध्ये ओळख निर्माण झाली.

यानंतर अग्रवाल बंधूंनी चांदनी चौक, दिल्ली येथे एक दुकान सुरू केले, जिथे त्यांनी त्यांची कौटुंबिक पाककृती तयार केली. असे म्हणतात की त्यांनीच पहिल्यांदा दिल्लीतील लोकांना मूग डाळ हलवा खाऊ घातला होता.

कंपनी पुढील तीन वर्षांत आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. 2030 पर्यंत 600 स्टोअर्स उघडण्याचे आणि 10 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

'बिकानेरवाला' नावाचा प्रवास

सुरुवातीला त्यांचे ट्रेडमार्क नाव बिकानेरी भुजिया भंडार होते. पण काही दिवसांनी त्यांचा मोठा भाऊ जुगलकिशोर अग्रवाल दिल्लीत आल्यावर त्यांनी नाव बदलण्यास सांगितले. यानंतर हे नाव 'बिकानेरवाला' ठेवण्यात आले.

1956 पासून आजतागायत 'बिकानेरवाला' हा ट्रेड मार्क राहिला आहे. दिल्लीतील 'बिकानेरवाला'चे पहिले दुकान 1956 मध्ये न्यू रोडवर उघडण्यात आले. 1962 मध्ये मोती बाजारात त्यांनी दुकान घेतले.

यानंतर, त्यांनी 1972-73 मध्ये करोलबागमध्ये एक दुकान विकत घेतले, जे आता देश आणि जगात बिकानेरवालाचे सर्वात जुने दुकान म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये दर महिन्याला हजारो लोक भेट देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT