Budget 2024 Social Spending Boost likely PM-Kisan payout, and housing and jobs push expected  Sakal
Personal Finance

Budget 2024: अर्थसंकल्पात अर्थमंत्री सामाजिक क्षेत्रातील योजनांवर भर देणार? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Will the Finance Minister focus on social sector schemes in the budget? अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर केंद्रात नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

राहुल शेळके

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर केंद्रात नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. अंतरिम अर्थसंकल्पात सरकार सहसा मोठ्या घोषणा करत नाही.

पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, रोजगार आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता वाढण्याची शक्यता

पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत सरकार लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी या योजनेच्या कक्षेत येतात. या योजनेंतर्गत त्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. (Possibility of increase in installment of Pradhan Mantri Kisan Samman Nidhi)

हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून शासनाच्या कृषी बजेटच्या 50 टक्क्यांहून अधिक निधी या योजनेवर खर्च झाला आहे. पहिल्या वर्षी सरकारने या योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती.

अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता 8,000-9,000 रुपयांपर्यंत वाढवू शकतात. याचा परिणाम जीडीपीवर 0.1 टक्क्यांनी होईल. त्यामुळे सरकारला योजनेवरील खर्च वाढवण्यासाठी फारसा त्रास होणार नाही.

आगामी अंतरिम अर्थसंकल्पात गृहनिर्माण योजनेची व्याप्ती वाढण्याची आणि नोकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे, असे इकॉनॉमिक टाइम्सने घेतलेल्या मतदानात तज्ज्ञांनी सांगितले आहे.

रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्याची शक्यता

ग्रामीण क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी, सरकार ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी काही योजना जाहीर करू शकते. केंद्र सरकार आगामी अंतरिम अर्थसंकल्पात सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी जास्त निधीचे वाटप करू शकते कारण वाढीव करवाढीमुळे पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकतो. (Possibility of promoting employment generation)

पीटीआयच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात मिळकत आणि कॉर्पोरेट करांच्या संकलनात वाढ दिसून येत आहे आणि एकूण प्रत्यक्ष कर संकलन अंदाजे 1 लाख कोटींपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT