Buying Gold with Credit Card: गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात वाढलेला राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्यावरचा लोकांचा विश्वास वाढला आहे. भारतीय लोक तर सोने विकत घेण्यासाठी अगदी कोणताही मुहूर्त चुकवत नाहीत! काही जण तर सोने खरेदी करताना थेट क्रेडिट कार्ड वापरतात. पण क्रेडिट कार्डचा वापर करुन सोने खरेदी करणे फायद्याचं आहे का? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
क्रेडिट कार्डने सोने खरेदी केल्यावर काही कार्ड्सवर कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात.
जसं की, तनिष्क, जोया आणि रिलायन्स ज्वेल्ससारख्या ब्रँड्सकडून 5% पर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
HDFC Regalia Gold किंवा Standard Chartered Ultimate कार्डसुद्धा रिवॉर्ड पॉइंट्स देतात. याशिवाय, क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यामुळे व्यवहाराची सुरक्षितता वाढते. फसवणूक किंवा चोरीचा धोका कमी होतो. खर्च ट्रॅक करणे सोपे जाते आणि योग्य वेळेवर बिल भरल्यास क्रेडिट स्कोरही सुधारतो.
सोने खरेदी करताना क्रेडिट कार्ड स्वाइप केल्यावर ‘प्रोसेसिंग फी’ द्यावी लागते. बऱ्याच क्रेडिट कार्ड कंपन्या प्रत्येक व्यवहारावर 3.5% किंवा त्याहून जास्त फी आकारतात. सोन्याच्या आधीच वाढलेल्या किमती, त्यावर ही अतिरिक्त फी – यामुळे ग्राहकांवर आर्थिक ताण वाढू शकतो.
जर तुम्ही परदेशी वेबसाइटवरून सोने खरेदी करत असाल, तर त्यावर ‘फॉरेन ट्रान्झॅक्शन फी’सुद्धा भरावी लागते. त्याशिवाय, प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात – कोणत्या ऑफर्स लागू आहेत, कोणते नियम बदलले आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे.
2013 पासूनच बँका आणि फायनान्स कंपन्यांना EMI वर सोने विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामागचं कारण म्हणजे देशाचा सोन्याचा साठा (Gold Reserve) कायम ठेवणे. काही बँकांनी ज्वेलरीवर EMI सुविधा देखील बंद केल्या आहेत. म्हणूनच, क्रेडिट कार्डने सोने खरेदी करण्याआधी तुमच्या बँकेचे नियम आणि ऑफर्स तपासून घ्या.
CA प्रनीत जैन यांचं म्हणणं आहे की, “क्रेडिट कार्ड शिस्तबद्ध लोकांसाठी आहे. वेळेवर बिल भरत असाल तर ठीक. पण उशीर केलात, तर 36-42% व्याज, लेट फी आणि GST यांची तयारी ठेवावी लागते. क्रेडिट कार्डने इन्व्हेस्टमेंट करू नये.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.