Credit card spends rise 27 percent to Rs 18.26 trillion in FY24 RBI data  Sakal
Personal Finance

Credit Card: भारतीयांमध्ये क्रेडिट कार्डची क्रेझ वाढली; खर्चात 27 टक्क्यांनी वाढ, 'या' बँकेतून झाले सर्वाधिक व्यवहार

Credit Card: 2023-24 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा खर्च वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी वाढून 18.26 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, तर एका वर्षापूर्वी तो सुमारे 14 लाख कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

राहुल शेळके

Credit Card: 2023-24 या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डचा खर्च वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी वाढून 18.26 लाख कोटी रुपयांवर पोहोचला, तर एका वर्षापूर्वी तो सुमारे 14 लाख कोटी रुपये होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

मार्च 2024 मध्ये क्रेडिट कार्डवरील खर्च 10.07 टक्क्यांनी वाढून 1.64 लाख कोटी रुपये झाला आहे. मार्चमध्ये सणासुदीचा हंगाम आणि आर्थिक वर्ष संपल्यामुळे क्रेडिट कार्डवर जास्त खर्च झाला. फेब्रुवारी 2024 मध्ये क्रेडिट कार्डचा खर्च 1.49 लाख कोटी रुपये होता.

केअर एज रेटिंग्सचे सहाय्यक संचालक सौरभ भालेराव यांच्या म्हणण्यानुसार, 'सणांचा हंगाम आणि आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने अनुक्रमे मार्चमध्ये अधिक व्यवहार झाले.'' क्रेडिट कार्डचा खर्च वाढतच राहील असे त्यांचे मत आहे.

मार्च 2024 मध्ये क्रेडिट कार्डवर एकूण 1.64 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कालावधीत, मार्च 2024 मध्ये पॉइंट ऑफ सेल (POS) व्यवहार वाढून 60,378 कोटी रुपये झाले, तर फेब्रुवारीमध्ये या अंतर्गत व्यवहार 54,431.48 कोटी रुपये होते. ई-कॉमर्समधून पेमेंट फेब्रुवारीमध्ये 0.95 लाख कोटी रुपयांवरून मार्चमध्ये 1.05 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले.

कार्ड प्रमुखांमध्ये, एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड व्यवहार फेब्रुवारीमध्ये 40,288.51 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये 8.57 टक्क्यांनी वाढून 43,471.29 कोटी रुपये झाले. या कालावधीत, ॲक्सिस बँकेचे व्यवहार रु. 17528.97 कोटींवरून 8.05 टक्क्यांनी वाढून रु. 18,941.31 कोटी झाले आहेत.

ICICI क्रेडिट कार्डचे व्यवहार फेब्रुवारीमध्ये 26,843.03 कोटी रुपयांवरून मार्चमध्ये 14.49 टक्क्यांनी वाढून 30,733.11 कोटी रुपये झाले. या कालावधीत एसबीआय कार्ड व्यवहार 7.32 टक्क्यांनी वाढून 24,949.17 कोटी रुपये झाले. मार्च 2024 मध्ये बँकांनी जारी केलेल्या एकूण क्रेडिट कार्डांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्चपर्यंत जारी केलेल्या क्रेडिट कार्डांची एकूण संख्या 1,010 लाखांवर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT