Hurun list of 200 Self-made Entrepreneurs Sakal
Personal Finance

Hurun list: सेल्फ-मेड आंत्रप्रन्योरच्या यादीत दमाणी नंबर वन, फ्लिपकार्टचे संस्थापक दुसऱ्या क्रमांकावर

Hurun list of 200 Self-made Entrepreneurs : महिलांमध्ये फाल्गुनी नायर अव्वल

राहुल शेळके

Hurun list of 200 Self-made Entrepreneurs : डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी हे मिलेनिया 2023 च्या टॉप 200 सेल्फ-मेड आंत्रप्रन्योरच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांचे मार्केट कॅप 2.38 लाख कोटी रुपये आहे.

30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या IDFC फर्स्ट प्रायव्हेट हुरुन इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे की त्यांच्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांची नावे आहेत.

झोमॅटोचे दीपंदर गोयल यांचाही समावेश

या यादीत झोमॅटोचे दीपिंदर गोयल आणि ड्रीम 11 चे प्रवर्तक भावित शेठ आणि हरीश जैन यांचाही समावेश आहे, ज्यांचे मार्केट कॅप 86,835 कोटी आहे.

या यादीतील 10 कंपन्यांमध्ये 8 स्टार्टअप आहेत. या यादीत 405 संस्थापकांचा समावेश आहे ज्यांनी 2000 पासून भारतात कंपन्या स्थापन केल्या आहेत. यादीतील 56 टक्क्यांहून अधिक संस्थापकांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे, तर 10 चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि 7 डॉक्टर आहेत.

आयआयटी दिल्लीचे 38 संस्थापक

यादीत समाविष्ट असलेले 38 संस्थापक आयआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. त्यापाठोपाठ 24 उद्योजक IIT मुंबई आणि 20 उद्योजक IIT खरगपूरमधील आहेत.

झेप्टोचे सह-संस्थापक हे सर्वात तरुण उद्योजक

यादीत समाविष्ट असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण मूल्य 30 लाख कोटी रुपये आहे, जे डेन्मार्कच्या जीडीपीएवढे आहे. कैवल्य वोहरा (21 वर्षे), किराणा वितरण अॅप झेप्टोचे सह-संस्थापक, या यादीतील सर्वात तरुण उद्योजक आहेत.

महिलांमध्ये फाल्गुनी नायर अव्वल

Nykaa कंपनीच्या फाल्गुनी नायर या यादीत आहेत. यादीतील सर्वात तरुण महिला ममार्थच्या गझल अलघ आणि विंजोच्या सौम्या सिंह राठौर आहेत. यादीतील उद्योजकांची सर्वाधिक संख्या बेंगळुरू (129), त्यानंतर मुंबई (78), गुरुग्राम आणि नवी दिल्ली (49) येथील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT