December 31 is the last day to file belated income tax returns  Sakal
Personal Finance

Income Tax Return: आयकर रिटर्न भरला नाही? 31 डिसेंबर आहे शेवटची तारीख

Income Tax Return: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपली आहे.

राहुल शेळके

Income Tax Return: आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. आयकर विभागाने 31 जुलै 2023 ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख जाहीर केली होती. आयकर विभागाने सांगितले की, 31 जुलैपर्यंत एकूण 6.50 कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

त्यापैकी 31 जुलैला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 36.91 लाख आयटीआर दाखल झाले. पण ज्यांनी अद्याप आयकर विवरणपत्र भरले नाही त्यांच्यासाठी कोणते पर्याय आहेत? ते आयकर रिटर्न भरू शकतात का? जाणून घेऊया.

जर तुम्ही करदाते असाल आणि 31 जुलै 2023 पर्यंत तुमचा ITR दाखल करू शकला नाही, तर तुमच्याकडे उशीरा ITR दाखल करण्याचा पर्याय आहे. आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी उशीरा ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. पण आता ITR भरण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.

दंड किती असेल?

ITR उशिरा भरल्यास, 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ITR उशीरा भरल्यास 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

ITR उशीरा दाखल केल्याने कर परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. याव्यतिरिक्त, उशीरा आयटीआर फाइल करणाऱ्यांच्या तपशीलांची अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाऊ शकते आणि कर संबंधित प्रकरणांमध्ये त्यांचे ऑडिट आणि चौकशी होण्याची शक्यता वाढते.

ITR कसा भरायचा?

अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरण्याची प्रक्रिया सोपी आहे. याचा अर्थ उशीरा आयटीआर भरण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही.

एक मोठा फरक असा असेल की ITR फॉर्म भरताना, तुम्हाला फॉर्ममधील संबंधित बॉक्समधील ड्रॉप-डाउन मेनूमध्ये 'सेक्शन 139(4) अंतर्गत दाखल केलेले रिटर्न' निवडावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT