Dhirubhai Ambani Success Story Sakal
Personal Finance

Dhirubhai Ambani Story: धीरूभाई अंबानींनी माती विकून असे कमावले होते पैसे, IPO आधी 3 वेळा बदलले होते रिलायन्सचे नाव

Dhirubhai Ambani Success Story: धीरूभाई अंबानींनी रिलायन्स कंपनीचा पाया घातला आणि तिला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनवले.

राहुल शेळके

Dhirubhai Ambani Death Anniversary: देश आणि जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या रिलायन्स उद्योगाचा पाया रचणारे धीरूभाई अंबानी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी एकट्याने रिलायन्स कंपनीचा पाया घातला आणि तिला देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक बनवले.

त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला आहे. अवघ्या 500 रुपये आणि तीन खुर्च्या असलेले कार्यालय उभारुन त्यांनी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचा पाया घातला.

त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण त्यांना व्यवसायाची जाण होती. मातीतूनही पैसे कमवण्याची युक्ती त्यांना माहीत होती. धीरूभाई अंबानी यांच्यातील व्यवसायाची कार्यक्षमता आणि समज किती आहे याचा अंदाज त्यांनी एका अरब शेखला माती विकून पैसे कमावले यावरून लावता येतो.

अरबस्तानच्या शेखला त्याच्या बागेत गुलाब हवे होते. म्हणून त्यांना विशेष मातीची गरज होती. धीरूभाई अंबानींना याची माहिती मिळताच त्यांनी शेखसाठी भारतातून माती पाठवली. त्याबदल्यात शेखने त्यांना मोठी रक्कम दिली होती.

व्यवसाय सुरुवातीच्या टप्प्यात होता, त्यामुळे त्यांना 14-15 तास काम करावे लागले. पण जो काही वेळ मिळेल तो कुटुंबासोबत घालवायचा. कामानंतरचा सगळा वेळ ते कुटुंबाला देत असे.

त्यांनी तीनदा त्यांच्या कंपनीचे नाव बदलले, पूर्वीचे नाव रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन होते जे बदलून रिलायन्स टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड आणि 1977 मध्ये शेवटी तिचे नाव रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ठेवले.

1977 मध्ये त्यांनी भारतातील पहिला IPO आणण्याचा निर्णय घेतला. धीरूभाई अंबानी जोखीम घेण्यात माहीर होते. कणखर व्यक्तिमत्व असलेल्या धीरूभाई अंबानींनी पैशाने पैसा कमावण्यास सुरुवात केली.

त्यांना शेअर बाजाराची चांगली जाण होती. रिलायन्स ही पहिली कंपनी होती जिच्या वार्षिक सभेसाठी स्टेडियम बुक करावे लागले. धीरूभाईंच्या विश्वासाच्या जोरावर कंपनी वाढत गेली.

6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात विभागली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update:'मुळशीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस'; धरण ९९ टक्‍के भरले, आत्तापर्यंत एकुण ७४२८ मिमी पाऊस

Pune Rain Update:'भोर तालुक्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस'; वरंधा घाटातील महाड हद्दीत दरड कोसळली, वाहतूक बंद

Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' 10 खास गोष्टी, घरात पसरेल आनंदाची लाट

Chiplun Flood News : चिपळूण, राजापूर, खेडमध्ये दुकानांसह घरांत पाणी, पाच नद्या वाहताहेत धोक्याच्या पातळीवर

Taj Mahal Video: ताजमहालच्या तळघरात नेमकं काय आहे? कायम बंद असलेल्या गूढ खोलीत शिरला तरुण, व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT