Fake Loan-App Trap Recover excess amount than loan using photos and information crime cyber police
Fake Loan-App Trap Recover excess amount than loan using photos and information crime cyber police sakal
Personal Finance

खोट्या लोन-अॅपचा ट्रॅप

सकाळ वृत्तसेवा

कर्ज देणाऱ्या चोरट्यांनी कर्ज वसूल झाल्यावर, मोबाईलमधील फोटो आणि माहितीचा वापरकरून कर्जापेक्षाही जास्त रकमेची वसुली केली.

- शिरीष देशपांडे

अलीकडच्या काळात खोट्या लोन-अॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले आहे. अनेक गरजू लोकांनी मोबाईल अॅपच्या जाहिरातीतील स्वस्त व्याजदराच्या मोहाने कर्जे घेतली आणि नंतर त्यांना पस्तावण्याची वेळ आली.

कारण कर्ज देणाऱ्या चोरट्यांनी कर्ज वसूल झाल्यावर, मोबाईलमधील फोटो आणि माहितीचा वापर करून कर्जापेक्षाही जास्त रकमेची वसुली केली. उत्तराखंड राज्यात पोलिसांनी अशी फसवणूक करणारी एक मोठी टोळी नुकतीच पकडली आहे.

हे कसे घडले ?

त्वरित कर्ज, काहीही तारण नको, कमी व्याजदर, बँकेत खेपा घालण्याची जरूर नाही, अशा जाहिरातींना भुलून अनेक गरजू लोकांनी कर्जे घेतली होती. तातडीचे वैद्यकीय उपचार, घराची दुरूस्ती, मुलांचे शाळेचे शुल्क भरणे अशा अनेक कारणांसाठी ही कर्जे घेतली होती.

कर्ज देणाऱ्या भामट्यांनी सगळीकडे ऑफिस उघडणे खर्चिक असल्याने, ऑफिस नाही, मात्र आमचा प्रतिनिधी आपल्या घरी येईल, असे सांगितले. यावर विश्वास बसलेल्या कर्जदारांकडून भामट्यांनी ‘केवायसी’साठी आवश्यक कागदपत्रे आणि फोटो जमा केले.

त्याच कागदपत्रांचा वापर करून खोटी खाती उघडली. कर्जाची परतफेड झाल्यावर हे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो तयार केले आणि ते नातेवाईकांना पाठवू अशी धमकी देऊन, आणखी रकमा उकळल्या.

एका तरुणाने दहा हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचे अश्लील फोटो त्याच्या नातेवाईकांना पाठवले. त्याला अनेकदा धमक्या दिल्या, अखेर त्या तरुणाने या धमक्यांना घाबरून आत्महत्या केली.

काय काळजी घ्यावी?

  • आपले आई-वडील जे देतात तेच फक्त फुकट असते. बाकी जगात स्वस्त आणि फुकट काहीही नसते, हे लक्षात ठेवा. स्वस्त व्याज म्हणजे नक्की धोका, हे लक्षात ठेवा.

  • अशा ऑनलाइन लोन-अॅपच्या भानगडीत अजिबात पडू नका. तातडीने पैसे हवे असल्यास बँकेतच जा. बँकेमध्ये आपल्याला समोर संपूर्ण यंत्रणा दिसते. ऑनलाइन प्रकरणात तुम्हाला पडद्यामागे काय आहे, याचा पत्ता लागू शकत नाही.

  • आजकाल सर्व प्रकारच्या कर्जांसाठी बँकांकडे विविध पर्याय असतात. त्याबाबत माहिती नसेल, तर एखाद्या माहितगाराची मदत घेऊन बॅंकेद्वारेच कर्ज घ्या.

  • बँकेचे कर्जवसुलीचे नियम आणि त्याची पूर्तता करण्याचे नियम ठरलेले असतात. त्यांच्या व्यवहारातील पारदर्शकता केव्हाही तपासता येते.

  • केवायसी कागदपत्रे, फोटो हे अपरिचित माणसाला कधीही देऊ नका .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT