Fertiliser, labour cost biggest challenge for Indian farmer Bayer report  Sakal
Personal Finance

Farmer Cost: वाढती मजुरी आणि महागड्या खतांमुळे 55 टक्के शेतकरी हैराण! अहवालात धक्कादायक माहिती

Fertiliser and Labour Cost Hike: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

राहुल शेळके

Labour Cost Hike: वाढत्या महागाईने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच खर्च दुप्पट झाल्याचे वास्तव आहे. मजुरी असो वा डिझेलचा खर्च किंवा शेतात लागणारे खत असो किंवा मजुरी प्रत्येकाचे भाव वाढले आहेत.

केवळ शेतीच नाही तर कुटुंब चालवण्यासाठी दैनंदिन वस्तूही महाग झाल्या आहेत. अशा स्थितीत उत्पन्न दुप्पट करण्याचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार हा मोठा प्रश्न आहे.

एका सर्वेक्षणानुसार, देशातील 55 टक्के लहान शेतकऱ्यांनी मान्य केले की, गेल्या काही काळात देशात अन्नधान्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच मजुरीचा खर्चही वाढला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत शेती करणे कठीण झाले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जर्मन कंपनीने केले सर्वेक्षण

या सर्वेक्षणात 47 टक्के शेतकऱ्यांनी मान्य केले की महागड्या वीजेमुळे शेती करणे कठीण झाले आहे. 37 टक्के शेतकर्‍यांनी शेतीतील उत्पन्न अस्थिर आहे असे सांगितले आहे. तर 36 टक्के शेतकर्‍यांनी पीक सुरक्षा हे मोठे आव्हान आहे असे सांगितले.

जर्मनीची कृषी आधारित कंपनी बायर क्रॉपसायन्सने या सर्वेक्षणात देशभरातील 2,056 शेतकऱ्यांचा समावेश केला आहे.

यासोबतच या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 42 टक्के शेतकऱ्यांनी मान्सूनमध्ये कमी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे यंदा पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी काय म्हणतात?

बायरच्या सर्वेक्षणात, 60 टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की भारतात डिजिटल तंत्रज्ञान वाढल्याने शेती करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मते, भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळे पीक सुरक्षा सुधारण्यास मदत झाली आहे.

यासोबतच सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 10 पैकी 8 शेतकरऱ्यांनी त्यांच्या शेतीशी संबंधित भविष्याबाबत आशावादी असल्याचे सांगितले आहे.

या सर्वेक्षणात या शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत उत्पन्नात मोठी घट झाल्याचे सांगितले. सहापैकी एका शेतकऱ्याने गेल्या दोन वर्षांत त्यांचे उत्पन्न 25 टक्क्यांहून अधिक घटल्याचे मान्य केले आहे. त्यांच्या उत्पन्नात 16 टक्क्यांनी घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

यासोबतच एकूण 76 टक्के शेतकरी हवामान बदल हा भविष्यातील मोठा धोका आहे असे मानतात. कंपनी बायर क्रॉपसायन्सने भारताव्यतिरिक्त चीन, जर्मनी, केनिया, युक्रेन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियातील लहान शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT