money
money Sakal
Personal Finance

New Rules From 1 June: गृहकर्जापासून ते विम्याच्या हप्त्यापर्यंत, आजपासून बदलणार 'हे' नियम, खिशावर होणार परिणाम

राहुल शेळके

Rules Changing From 1 June 2023: तुमच्या खिशाशी संबंधित अनेक बदल आजपासून होणार आहेत. आजपासून, खाजगी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्सचा वार्षिक दर 2,072 रुपयांवरून 2,094 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

तुम्ही SBI म्हणजेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजपासून ते थोडे महाग होईल. रिझर्व्ह बँक '100 दिवस 100 पेमेंट' मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेतला जाईल.

सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा अंमलात येणार आहे. देशातील 256 जिल्ह्यांसोबतच आता इतर 32 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे.

भारतातून कफ सिरपच्या निर्यातीबाबत सरकारने महत्त्वाची अट घातली आहे. आता कफ सिरप निर्यातदारांना त्यांची उत्पादने परदेशात पाठवण्यापूर्वी विहित सरकारी प्रयोगशाळांमध्ये तपासणे आवश्यक आहे.

विम्याचा हप्ता महागणार:

रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, खाजगी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्सचा वार्षिक दर 2,072 रुपयांवरून 2,094 रुपये करण्यात आला आहे.

1000 ते 1500 सीसी इंजिन क्षमता असलेल्या खाजगी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स 2019-20 मध्ये 3,221 रुपयांवरून 3,416 रुपये करण्यात आला आहे.

1500 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या मोठ्या खाजगी वाहनांसाठी प्रीमियम 7,890 रुपयांवरून 7,897 रुपयांपर्यंत केला जाईल. त्याचप्रमाणे दुचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी विम्याचा हप्ता महाग होणार आहे.

एसबीआयचे गृहकर्ज महागले:

तुम्ही SBI म्हणजेच स्टेट बँकेकडून गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजपासून ते थोडे महाग होईल. SBI ने गृहकर्ज 40 बेस पॉइंट्सने 7.05% ने वाढवले आहे. SBI च्या वेबसाइटनुसार, वाढलेले दर 1 जून 2022 पासून लागू होतील.

दावा न केलेली ठेवींचा शोध:

रिझर्व्ह बँक '100 दिवस 100 पेमेंट' मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेतला जाईल.

यासंदर्भात सर्व बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक बँकेला 100 हक्क नसलेल्या ठेवींची 100 दिवसांतच सेटलमेंट करावी लागणार आहे.

गोल्ड हॉलमार्किंग नियम:

सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा अंमलात येणार आहे. देशातील 256 जिल्ह्यांसोबतच आता इतर 32 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे. हा आदेश गेल्या वर्षीच काढण्यात आला होता. मात्र सरकारकडून पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेच्या चाचणीनंतरच कफ सिरपची निर्यात:

भारतातून कफ सिरपच्या निर्यातीबाबत सरकारने महत्त्वाची अट घातली आहे. आता कफ सिरप निर्यातदारांना त्यांची उत्पादने परदेशात पाठवण्यापूर्वी विहित सरकारी प्रयोगशाळांमध्ये तपासणे आवश्यक आहे.

तेथून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कफ सिरप निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. गेल्या महिन्यात अनेक देशांतून भारतीय कफ सिरपची मागणी करण्यात आली होती. अशा परिस्थितीत आता विदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) या प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT