Goair to pay flyer rs 1 lakh for cancelled flight  Sakal
Personal Finance

GoAir: तिकीटाचा घोळ अन् एक लाखाचा दंड; गुजराती प्रवाशाने शिकवला विमान कंपनीला धडा, काय आहे प्रकरण?

GoAir: विमान रद्द केल्यामुळे गुजरातच्या ग्राहक मंचाने विमान कंपनीला तिकिटाच्या किंमतीच्या तिप्पट भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. वडोदरा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने हा निर्णय दिला आहे

राहुल शेळके

GoAir: विमान रद्द केल्यामुळे गुजरातच्या ग्राहक मंचाने विमान कंपनीला तिकिट किंमतीच्या तिप्पट भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. वडोदरा जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने पीयूष कालवाणी यांना 1.17 लाख रुपये, मानसिक छळासाठी रुपये 3,000 आणि कायदेशीर खर्च म्हणून 2,000 रुपये देण्याचे निर्देश GoAirला (इंडिया) दिले आहेत. रद्द केलेल्या फ्लाइटच्या तिकिटाची किंमत 35,140 रुपये होती.

आयोगाने निरीक्षण नोंदवले की, कालवाणी यांनी तिकिटासाठी दिलेले पैसे तसेच GoAir फ्लाइट रद्द केल्यानंतर पर्यायी विमान तिकीटासाठी अतिरिक्त रक्कम परत न करून एअरलाइनने नियमांचे उल्लंघन केले आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये, कालवाणी या व्यावसायिकाने 30 एप्रिल 2023 साठी अहमदाबाद ते श्रीनगर दिल्लीमार्गे आपल्या कुटुंबातील पाच जणांसाठी तिकिटे बुक केली होती. त्यांनी 37,440 रुपये दिले. कालवाणीने 6 मे 2023 साठी श्रीनगर ते अहमदाबाद मार्गे दिल्लीचे परतीचे तिकीट देखील बुक केले, ज्यासाठी त्यांनी 35,140 रुपये दिले.

28 एप्रिल 2023 रोजी, कालवाणी यांना एअरलाइनकडून एक एसएमएस आला की त्यांची 6 मे 2023 ची परतीची फ्लाइट रद्द झाली आहे. जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा एअरलाइनने त्यांना सांगितले की रद्द केलेली फ्लाइट पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

कालवाणी यांनी तिकिटाचे पैसे आधीच भरले असून त्यांनी दौरा रद्द केला असता तर अधिक नुकसान झाले असते असे सांगितले. म्हणून, त्यांनी योजनेनुसार श्रीनगरला गेले परंतु 3 मे 2023 रोजी, त्यांना एअरलाइनकडून दुसरा मेसेज आला की त्यांचे परतीची फ्लाइट रद्द झाली आहे.

कालवाणी यांना एअर इंडियासोबत दुसरे फ्लाइट बुक करायचे होते, त्यासाठी त्यांनी 1.17 लाख रुपये दिले. गुजरातला घरी परतल्यानंतर, त्यांनी GoAir कडून रद्द केलेल्या फ्लाइटसाठी 35,140 रुपये परतावा मागितला आणि एअर इंडियाच्या रिटर्न तिकिटासाठी 82,050 रुपये अतिरिक्त तिकीटाचे पैसे मागितले. गोएअरने पैसे परत करण्यास नकार दिल्याचे कालवाणी यांनी सांगितले.

त्यानंतर कालवानी यांनी गोएअर विरुद्ध ग्राहक आयोगाकडे ऑगस्ट 2023 मध्ये तक्रार दाखल केली आणि 18% व्याजासह 1.17 लाख रुपये आणि मानसिक छळ तसेच कायदेशीर खर्चासाठी 25,000 रुपये मागितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT