Gold Has Touched rs 72,000 Per 10 Grams Is Now The Right Time To Invest Or Should Wait
Gold Has Touched rs 72,000 Per 10 Grams Is Now The Right Time To Invest Or Should Wait Sakal
Personal Finance

Gold Investment: सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर; गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

राहुल शेळके

Gold Prices at Record High: सोन्या -चांदीपासून ते निफ्टी आणि सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. नुकताच सेन्सेक्सने 75,000 चा आकडा गाठला आहे. त्याचवेळी सोन्याचा भाव 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 82,000 रुपये किलोवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

सोन्याने दिला 14 टक्के परतावा

सोन्याने गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. चांदीनेही 9 टक्के परतावा दिला आहे. तर शेअर बाजारात बेंचमार्क निर्देशांकाने सार्वकालिक उच्चांक गाठूनही साडेचार ते पाच टक्के परतावा दिला आहे.

सोन्याचे भाव कधी वाढतात?

जगभरात मंदी असते तेव्हा सोन्या-चांदीचे भाव वाढतात. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे लोक सोन्यात गुंतवणूक करतात.अर्थव्यवस्थेत तेजी आली की सोन्याचे भाव घसरतात. पण सोने, चांदी आणि इक्विटी मार्केट एकाच वेळी वाढत आहेत, हा अपवाद आहे. जेव्हा आर्थिक वाढ चांगली नसते तेव्हा सोने तेजीत राहते. पण सध्या अर्थव्यवस्था चांगली आहे आणि सोन्या-चांदीचे भावही वाढत आहेत.

सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?

जर तुमचा पोर्टफोलिओ सोन्यामध्ये 10 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान असेल तर तो कायम ठेवा. जर तो 15 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर थोडे सोने विकून नफा कमवा आणि पोर्टफोलिओला योग्य पातळीवर आणा, असा सल्ला गजल जैन, (फंड मॅनेजर क्वांटम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी) यांनी दिला आहे.

नुकत्याच झालेल्या वाढीनंतर सोन्याच्या भावात काहीशी घसरण होऊ शकते. भाव कमी झाल्यावर खरेदी करण्याचा सल्ला मानव मोदी,(विश्लेषक मोतीलाल ओसवाल सर्व्हिसेस) देतात. नवीन गुंतवणूकदारांनी एकरकमी खरेदी करण्याऐवजी क्रमाक्रमाने खरेदी करावी. सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार अभिषेक कुमार सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचे सुचवतात.

सध्या सोन्याचे भाव का वाढत आहेत?

  • पश्चिम आशियातील तणाव आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी वाढली आहे.

  • जागतिक आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी 2024 मध्ये 1,037 टन सोने खरेदी केले. 2022 च्या विक्रमी खरेदीपेक्षा हे थोडे कमी होते. 2024 मध्येही हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.

  • यंदा अमेरिका, भारत आणि युरोपीय देशांसह अनेक देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. राजकीय अनिश्चितता शेअर बाजार अस्थिर करू शकते आणि सोने खरेदीला चालना मिळू शकते.

  • भावात वाढ असूनही, भारत आणि चीन सारख्या देशांमध्ये मागणी खूप जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT