Gold Rates Sakal
Personal Finance

Gold Rates: सोन्याच्या भावात 2,500 रुपयांची घसरण; गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे.

राहुल शेळके

Gold Rates Cut: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 60,000 रुपयांपर्यंत खाली आली आहे. गेल्या महिनाभरात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती त्यामुळे सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या वर होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सोन्याने विक्रमी वाढ नोंदवली होती आणि गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 61,800 रुपयांवर गेला होता. मात्र, आता त्याची किंमत 2,500 प्रति 10 ग्रॅमवर घसरण ​झाली आहे. सोन्याच्या किंमतीतील घसरण डॉलरच्या मजबूतीमुळे झाली आहे.

रिद्धिसिद्धी बुलियन्स (RSBL) चे एमडी पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, 13 जून रोजी होणाऱ्या यूएस फेडच्या बैठकीपूर्वी सोन्याचे भाव 60,000 रुपयांच्या खाली आहेत.

अशा परिस्थितीत फेडच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसू शकतो. जूनच्या बैठकीत फेड व्याजदर स्थिर ठेवू शकते असा अंदाज आहे.

सोन्याच्या भावात अधिक घसरण होईल का?

विश्लेषकांचा असा अंदाज आहे की उन्हाळा हा पारंपारिकपणे सोन्यासाठी घसरणीचा हंगाम आहे, कारण भविष्यात पिवळ्या धातूची मागणी वाढवण्यासाठी कोणतेही महत्त्वाचे घटक नाहीत. तसेच, आगामी यूएस फेड बैठकीच्या निकालाचा सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम होणार आहे.

त्यामुळे सोन्याचा भाव वाढू शकतो?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डॉलर निर्देशांक 104.50 ची पातळी राखण्यात सक्षम नाही. अशा स्थितीत अमेरिकेतील महागाईचा दर आणि अमेरिकेतील बेरोजगारीची संख्या त्यामुळे फेडला व्याजदर वाढवण्यापासून रोखू शकते. याचा अर्थ सोन्याचे भाव वाढू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, सोने 58,600 रुपयांच्या खाली जाऊ शकते. यानंतर त्यात वाढ होऊ शकते आणि 61,440 रुपयांच्या जवळ पोहोचू शकते. याच्या वर, पुढील वाढ रु. 62,500 आणि रु. 63,650 वर जाऊ शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा सोन्या-चांदीतील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT