Gold rate today hits new peak of rs 66,778 after US Fed meeting
Gold rate today hits new peak of rs 66,778 after US Fed meeting  Sakal
Personal Finance

Gold Rate Today: सोन्या-चांदीने गाठला विक्रमी उच्चांक; सोने 67,000च्या जवळ, भावात का होत आहे वाढ?

राहुल शेळके

Gold-Silver Rate Today 21th March 2024: आज सोन्याच्या भावाने पुन्हा उच्चांक गाठला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर कायम ठेवण्याचा आणि आगामी काळात त्यात तीनदा कपात करण्याच्या निर्णयामुळे सराफा बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

आगामी काळात जनतेला दिलासा देण्याचे आश्वासन फेडने दिले आहे. सध्या अमेरिकेतील व्याजदर 5.3 टक्के आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर, हे व्याजदर जुलै 2023 पासून समान पातळीवर राहिले आहेत.

फेडच्या बातम्यांचा प्रभाव MCX वर दिसला आणि सोन्याचा भाव एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढला. याशिवाय चांदीच्या दरात वाढ दिसून आली. गुरुवारी (21मार्च) सकाळी सोने 66,778 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले

चांदी भावात 600 रुपयांची वाढ

गुरुवारी चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. बुधवारी 75313 रुपयांच्या बंद दराच्या तुलनेत आज चांदी सुमारे 600 रुपयांच्या वाढीसह 78323 रुपयांवर उघडली. इंट्राडे दरम्यान त्यात 3,000 रुपयांची वाढ झाली आहे.

सोने-चांदी का वाढत आहे?

भू-राजकीय आघाडीवर असे अनेक धोके दिसत आहेत, त्यामुळे सोन्याची चमक वाढू शकते. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत रशिया मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरूच आहे.

त्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या सागरी जहाजांचे मार्ग बदलावे लागत आहेत. अमेरिकेत या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्याचा परिणाम बाजारावर मोठा परिणाम होईल.

चीनमध्ये सोन्याची खरेदी वाढली

दुसरीकडे, चीनमधील मध्यवर्ती बँकेशिवाय सर्वसामान्य लोक सोने खरेदी करत आहेत. याचाही परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. जवळपास वर्षभरापासून प्रॉपर्टी मार्केटमधील घसरणीनंतर लोकांचा सोन्यावरील विश्वास वाढला आहे. त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी ते सोन्याची नाणी, सोन्याचे बार आणि दागिने खरेदी करत आहेत.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT