Gold Silver Price
Gold Silver Price Sakal
Personal Finance

Gold Silver Price: सोन्याच्या भावात घसरण तर चांदी 1,650 रुपयांनी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा दर

राहुल शेळके

Gold Silver Price: आज, 12 मे 2023 रोजी जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीचे भाव भारतीय सराफा बाजारात घसरले आहेत. 10 ग्रॅम सोने 61,370 रुपयांवर आले आहे. एक किलो चांदीचा भाव 75,950 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 330 रुपयांनी घसरून 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 61,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भाव 1,650 रुपयांनी घसरून 77,800 रुपये प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे 2,026 डॉलर प्रति औंस आणि 25.10 डॉलर प्रति औंस या पातळीवर होते. या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये भारतातील सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटली आहे. या काळात सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घटून 112.5 टन झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT