Gold Silver Rate
Gold Silver Rate esakal
Personal Finance

Gold Silver Price : होळीला सोनं स्वस्त! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत होती. होळी तोंडावर सोन्याच्या दरात तेजीही दिसून आली होती मात्र होळीच्या दिवशीच सोने स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. देशात काही भागात 7 मार्चला होळी साजरी करण्यात आली तर काही भागात आज म्हणजे 8 मार्चला होळी साजरी केली जात आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोने खरेदीकडे सर्वांचा कल आहे.

गूड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 56,350 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 670 रूपये आहे. (Gold Silver Price update 8 March 2023)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 57,110 रुपये

दिल्ली - 56,500 रुपये

हैदराबाद - 56,350 रुपये

कोलकत्ता - 56,350 रुपये

लखनऊ - 56,500 रुपये

मुंबई - 56,350 रुपये

पूणे - 56,350 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT