HDFC Bank hikes rates of new home loan ahead of RBI MPC meeting next week
HDFC Bank hikes rates of new home loan ahead of RBI MPC meeting next week Sakal
Personal Finance

HDFC Bank Home Loan: एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; गृहकर्जावरील व्याजदरात केली वाढ

राहुल शेळके

HDFC Bank Home Loan: खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बँकेने ग्राहकांना गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या रेपो-लिंक्ड होम लोनवरील व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्जाचे दर 8.70 ते 9.8 टक्क्यांपर्यंत आले आहेत.

बँकेच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या विलीनीकरणामुळे गृहकर्ज दरांमध्ये हा बदल झाला आहे आणि आता तो रिटेल प्राइम लेंडिंग रेटशी (आरपीएलआर) जोडला जाणार नाही.

बँकेने आपल्या वेबसाइटवर स्पष्ट केले की गृहकर्ज दरातील बदल 1 जुलै 2023 रोजी HDFC बँक आणि HDFC च्या विलीनीकरणामुळे झाला आहे आणि तो यापुढे रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) शी जोडला जाणार नाही. आ

आरबीआयच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक 3 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीत होणार आहे. आरबीआयची नवीन आर्थिक वर्ष 2024 -25 ची पहिली बैठक असेल.

इतर बँकांचे व्याजदर?

ICICI बँकेचे सध्याचे गृहकर्ज व्याजदर 9 टक्के ते 10.05 टक्के दरम्यान आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गृहकर्ज दर 9.15 टक्के ते कमाल 10.05 टक्के आहेत. ॲक्सिस बँकेचे सध्याचे गृहकर्ज व्याजदर 8.75 ते 9.65 टक्के पर्यंत आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर 8.70 टक्के आहे.

चलनविषयक धोरण समितीच्या कधी आणि किती बैठका?

RBI ने नवीन आर्थिक वर्ष (2024-25) साठी चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या द्वि-मासिक बैठकांचे वेळापत्रक जाहीर केले. पहिली बैठक 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. पुढील बैठक 5 जून रोजी सुरू होईल तर आर्थिक आढावा 7 जून रोजी जाहीर केला जाईल.

यानंतर पुढील बैठक 6 ते 8 ऑगस्ट, त्यानंतर 7 ते 9 ऑक्टोबर, त्यानंतर 4 ते 6 डिसेंबर आणि शेवटची बैठक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT