Hinduja Group Survey Operation Sakal
Personal Finance

Hinduja Group: आयकर विभागाच्या रडारवर हिंदुजा समूह, मुंबईसह अनेक शहरांत सर्च ऑपरेशन सुरु, काय आहे प्रकरण?

Hinduja Group Survey Operation: हिंदुजा समूहाकडून आयटी छाप्याशी संबंधित कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

राहुल शेळके

Hinduja Group Survey Operation: देशातील अनेक क्षेत्रात मोठा वाटा असलेला हिंदुजा समूह आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. आयकर विभागाने मुंबईसह अनेक शहरांमध्ये या ग्रुपच्या ठिकाणांवर सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. कर चुकवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, करचोरी प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून, मुंबईसह अनेक शहरांमध्ये असलेल्या हिंदुजा ग्रुपच्या जागेवर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. जनरल अँटी अवॉयडन्स रुल्स (GAAR) अंतर्गत करचुकवेगिरीच्या तपासासंदर्भात ही शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हिंदुजा समूहामध्ये इंडसइंड बँक, हिंदुजा लेलँड फायनान्स, हिंदुजा बँक (स्वित्झर्लंड), अशोक लेलँड, अशोक लेलँड फाउंड्रीज किंवा हिंदुजा फाउंडरीज, स्विच मोबिलिटी, पीडी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, हिंदुजा टेक लिमिटेड, आणि हिंदुजा रियालिटी व्हेंचर्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

आतापर्यंत हिंदुजा समूहाकडून आयटी छाप्याशी संबंधित कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. बँकिंग आणि वित्त क्षेत्राव्यतिरिक्त, समूह आता टेक, डिजिटल आणि फिनटेक क्षेत्रात आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहे. हिंदुजा समूह युरोप, आशिया, मध्य पूर्व आणि अमेरिकेत पसरलेला आहे.

1979  मध्ये हिंदुजा कुटुंब लंडनला स्थलांतरित झाले. हिंदुजा ग्रुप हा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहे. चार भावांकडे इंग्लंडमधील उत्पादन युनिटसह अनेक महत्त्वाच्या रिअल इस्टेट मालमत्ता आहेत. हिंदुजा ग्रुपने आलिशान पंचतारांकित हॉटेल बांधण्यासाठी जुने वॉर ऑफिस ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT