2000 Rupees Note Sakal
Personal Finance

2,000 Rupee Notes: फाटलेल्या 2000 रुपयांच्या नोटेची किंमत किती? काय सांगतो RBIचा नियम

2000 ची नोट फाटली किंवा जळाली तर बँका ती स्वीकारतील का?

राहुल शेळके

2,000 Rupee Notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या आहेत. 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहेत.

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यातील एक प्रश्न असा आहे की 2000 ची नोट फाटली किंवा जळाली तर बँका ती स्वीकारतील का?

फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (नोट रिफंड) नियमानुसार बदलल्या जाऊ शकतात. निरुपयोगी नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात आणि देशभरातील नियुक्त बँकांमध्ये बदलल्या जाऊ शकतात.

तुमच्याकडेही 2000 ची फाटलेली नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला या फाटलेल्या नोटा बदलून मिळवू शकतात.

फाटलेल्या नोटा कोणत्या बँकांमध्ये बदलल्या जातील?

फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा फक्त आरबीआयने नियुक्त केलेल्या बँकांमध्येच उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या असून त्यांनी बँकांनी शाखांमध्ये या सुविधेसाठी फलकही लावावेत असे RBI ने सांगिलते आहे. अशा परिस्थितीत बँकेचे कर्मचारी तुमच्या नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाहीत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियम

फाटलेल्या नोटांच्या पेमेंटशी संबंधित नियम:

फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण नोटांच्या स्थितीवर अवलंबून असते. आरबीआयने प्रत्येक मूल्याच्या फाटलेल्या नोटा देण्याबाबत नियम निश्चित केले आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटेची लांबी 16.6, रुंदी - 6.6 आणि क्षेत्रफळ 109.56 आहे.

अशा स्थितीत नोट 88 स्क्वेअर सेमी खराब झाली असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. तर 44 स्क्वेअर सेमीवर नोट खराब झाली असेल तर फक्त अर्धे पैसे मिळतील.

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँक ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. बँक अशा नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकते ज्या वाईटरित्या फाटलेल्या किंवा पूर्णपणे जळलेल्या आहेत. काही अत्यंत वाईट स्थितीच्या नोटा फक्त RBI कार्यालयात जमा केल्या जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT