2000 Rupees Note Sakal
Personal Finance

2000 Rupees Note: ज्यांचे बँक खाते नाही, ते 2,000 रुपयांच्या नोटा कशा बदलणार?

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयने घेतला.

राहुल शेळके

2000 Rupees Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली आहे. यासह, देशाच्या मध्यवर्ती बँक आरबीआयने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले असून यासाठी बँकांना विशेष व्यवस्था करावी लागणार आहे.

ज्यांचे बँक खाते नाही, ते 2000 रुपयांच्या नोटा कशा बदलणार?

आरबीआयच्या या नव्या निर्णयानुसार ज्यांचे बँक खाते नाही ते लोक 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकणार नाहीत का?

आरबीआयने यासाठीही व्यवस्था केली आहे आणि आपल्या निर्णयात स्पष्टपणे लिहिले आहे की ज्यांचे बँक खाते नाही ते देखील बँकेत जाऊन 20,000 रुपयांपर्यंतच्या 2000 च्या नोटा एकावेळी बदलू शकतात.

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत एक FAQ जारी केला आहे, ज्यानुसार अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

2000 रुपयांच्या नोटा बदलण्याबाबत RBI च्या काय सूचना आहेत?

  • 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा कोणत्याही बँकेत बदलता किंवा जमा करता येतील.

  • 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

  • एका वेळी 20,000 रुपये बँकेत बदलले किंवा जमा केले जाऊ शकतात.

  • आरबीआयच्या 19 शाखांमध्येही नोटा बदलता येतील.

  • याचा अर्थ आरबीआय आणि इतर सर्व बँकांमध्ये नोटा बदलता येतील.

  • एकूण रक्कम एकावेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

सन 2016 च्या नोटबंदीनंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे लोकांना व्यवहार करण्यासाठी तातडीने दोन हजार रुपयांच्या या नोटा चलनात आणल्या होत्या.

मात्र कालांतराने चलनात इतर नोटा पुरेशा संख्येने आल्यामुळे आता दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT