Hurun India Rich List more than 1300 indians are part of 1000 crore plus networth club
Hurun India Rich List more than 1300 indians are part of 1000 crore plus networth club  Sakal
Personal Finance

Richest Indians: भारतात अब्जाधीशांची संख्या चीन, ब्रिटन आणि युरोपपेक्षाही जास्त; काय आहे कारण?

राहुल शेळके

Hurun India Rich List: हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या भारतीयांच्या संख्येत वाढ झाली आहे, ज्यात 270 नवीन श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे, चीन आणि ब्रिटनमधील श्रीमंतांच्या संख्येत घसरण झाली आहे. ही आकडेवारी आर्थिक विषमता दर्शवते, असे जगभरातील श्रीमंत व्यक्तींची अधिकृत यादी प्रकाशित करणाऱ्या हुरुन ग्लोबलचे अध्यक्ष रुपर्ट हुगवर्फ यांनी सांगितले.

हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, देशात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या 1,319 व्यक्ती आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा श्रीमंतांच्या संख्येने 1,300 चा टप्पा ओलांडला आहे, गेल्या पाच वर्षांत यामध्ये 76% टक्के वाढ झाली आहे.

1998 पासून श्रीमंतांची माहिती घेणारे रुपर्ट हुगवर्फ म्हणाले की, त्यांना जगातील इतर भागांतील व्यावसायिकांच्या तुलनेत भारतीय व्यावसायिकांमध्ये खूप आत्मविश्वास दिसतो. भारतातील व्यावसायिकांना पुढचे वर्ष चांगले जाईल असे वाटते, तर चीनमध्ये पुढचे वर्ष वाईट असेल असे त्यांना वाटते. मला युरोपमध्येही आशावाद वाटत नाही.

भारत आणि चीनमधील श्रीमंतांची तुलना करताना, हुगवर्फ यांनी सांगितले की दोन्ही देशांच्या श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेल्या लोकांमध्ये फरक आहे. भारताच्या बाबतीत, कुटुंबावर आधारित रचना आहे, ज्यांचे व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. चीनमध्ये बहु-पिढीच्या बिझनेस हाऊसची संख्या कमी आहे.

हुगवर्फ म्हणाले की, भारत, जर्मनी आणि जपान अपवादात्मकपणे मजबूत आहेत. या देशांमध्ये कौटुंबिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. याउलट, अमेरिकेमध्ये अंदाजे 60%–70% व्यवसाय मालक पहिल्या पिढीतील आहेत. जर आपण हाँगकाँग आणि तैवानसह चीनकडे पाहिले तर पहिल्या पिढीतील व्यावसायिकांची संख्या सुमारे 95% आहे.

आगामी काळात हुगवर्फ यांनी सांगितले की सर्वात श्रीमंत लोक दोन क्षेत्रांतून उदयास येणार आहेत. पहिला सेक्टर AI आणि दुसरा सेक्टर म्हणजे इलेक्ट्रिक वाहने. अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांना एआयचा फायदा झाला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे मूल्यांकन 700-800 अब्ज डॉलर्सनी वाढले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत विशेषत: चीनमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT